पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पुणेकर कोयता गँगच्या (koyta gang)दहशतीखाली आहेत. या गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस (Crime News) धडक कारवाई करत आहेत. परंतु त्यानंतर गँगची दहशत कमी झालेली नाही. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. आता पुणे शहरात दोन गुन्हेगारांमध्ये गँगवार झाले आहे. मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत कोयत्याने वार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले
पुणे शहरातील हडपसर भागात गँगवॉरचा प्रकार घडला. मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत सराईत गुन्हेगारांकडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर कोयत्याने वार करण्यात आले. रिक्षेला दुचाकी आडवी लावून रिक्षातून बाहेर पडणाऱ्या शुभम भोंडे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार” असे म्हणून शुभम भोंडे याच्यावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले. 2020 साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर शुभम बाहेर आला आहे. त्याला रस्त्यात गाठत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. दरम्यान घटनेतील आरोपी ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. या प्रकारामुळे पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे.
मागील आठवड्यात तोडला एकाचा पंजा
पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाचा मनगटापासून पंजा तोडण्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. पुण्यातील कात्रज भागात भर दिवसा हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अखिलेश चंद्रकांत कलशेट्टी या तरुणाचा कोयत्याने वार करुन पंजा तोडला गेला होता.