pune gas cyclinder blast | पुणे गॅस सिलेंडर स्फोट…आरोग्य मंत्री संतापले…24 तासांत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
pune gas cyclinder blast | पिंपरी, चिंचवड शहरात गॅस चोरीची काळाबाजार सुरू होता. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम महाविद्यालयासमोर असलेल्या खुल्या जागेवर हा प्रकार होत होता. त्यानंतर आरोग्यमंत्री चांगलेच संतापले आहेत. त्यांनी...
रणजित जाधव, पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पिंपरी- चिंचवडमध्ये अवैद्यरित्या गॅस रिफलिंग करताना भीषण स्फोट झाला. एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरचा या ठिकाणी स्फोट झाला. विशेष म्हणजे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची शाळा असलेल्या परिसरात हा स्फोट झाला. यामुळे आरोग्य मंत्री चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन आजच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात त्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणात चार जणांना अटक झाली आहे.
24 तासांच्या आत अधिकाऱ्यांच्या बदल्या करा
तानाजी सावंत यांनी सोमवारी जेएसपीएम महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्या त्या जागेपासून शाळा, महाविद्यायजवळ आहे. यामुळे पोलिसांवर त्यांनी संताप व्यक्त केला. गॅस सिलेंडरचा हा स्फोट सकाळी झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शेकडो जण जखमी झाले असते. ससून रुग्णालयामध्ये ड्रग्स माफिया आहेत. येथे गॅस माफिया तयार झाले आहेत. आजची तीन ते चार अधिकाऱ्यांची बदली करा. २४ तासांच्या आत ही कारवाई झाली पाहिजे, असे आदेश तानाजी सावंत यांनी दिले.
गॅस माफियांचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी- चिंचवडमध्ये गॅसच्या टँकरमधून अवैद्यरित्या कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरला जात होता. रविवारी रात्री सुरु असलेल्या या प्रकाराच्या वेळेस भीषण स्फोट झाला. सलग नऊ टाक्यांचा स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. गॅस सिलेंडर स्फोटांचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू गेला. धुरांचे लोट काही किलोमीटरपर्यंत दिसत होते. सुदैव चांगले होते की यामध्ये जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरातील गॅस माफियांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अवैद्यरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
पोलीस आणि आरोग्य मंत्री सावंत यांच्यात नेमका काय संवाद झाला?
इथं कॉलेज आहे, शाळा आहेत. दिवसा ही घटना घडली असती तर शेकडो लोक जखमी झाले असते किंवा आणखी काही झाले असते.. गॅस रिफलिंग करणे हे सर्व दोन नंबरचे काम आहे. ससूनमध्ये जसे ड्रग्स माफिया सापडले तसे हे गॅस माफिया आहेत. रिफलिंग करून दोन नंबर करायचे आणि गॅस विकायचा, असा प्रकार सुरु आहे. त्याला येथील पोलीस ठाणे जबाबदार आहे. यासंदर्भातील सगळी माहिती माझ्याकडे आहे. २४ तासांत तीन- चार पोलिस अधिकारी बदलले पाहिजेत, कारवाई करा…तुम्हाला उपमुख्यमंत्री बोलतीलच.
यावर अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी…सगळ्या गोष्टी बघू सर, असे म्हणत विषय बदलण्याचा प्रयत्न केला..सामंत पुन्हा म्हणाले, या कॅप्सूल टँकरचा स्फोट झाला असता तर काय झाले असत?,