Pune Gold Rate | पुण्यात चांदीच्या दरात 800 रुपयांची उसळी तर सोनंही काहीसं वाढलं, आज काय आहे सोन्या-चांदीचा दर?
गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात सोन्याच्या (Pune Gold Rate) दरात सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहे. काल सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज बाजापेठ सुरू झाली तेव्हा सोन्याचा दर प्रतितोळा 10 रुपयांनी वाढला आहे.
![Pune Gold Rate | पुण्यात चांदीच्या दरात 800 रुपयांची उसळी तर सोनंही काहीसं वाढलं, आज काय आहे सोन्या-चांदीचा दर? Pune Gold Rate | पुण्यात चांदीच्या दरात 800 रुपयांची उसळी तर सोनंही काहीसं वाढलं, आज काय आहे सोन्या-चांदीचा दर?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/17150130/Gold-and-Silver-min.jpg?w=1280)
पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात सोन्याच्या (Pune Gold Rate) दरात सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहे. काल सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज बाजापेठ सुरू झाली तेव्हा सोन्याचा दर प्रतितोळा 10 रुपयांनी वाढला आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 48 हजार 670 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 45,460 रुपये प्रतितोळा आहे. (silver has seen a record rise, while gold has risen slightly In Pune)
चांदीच्या दरात मोठी उसळी
आज पुण्यात चांदीच्या दराने (Pune Silver Rate) विक्रमी उसळी घेतली आहे. आज पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 62 हजार 800 रुपयांवर गेला आहे. काल हा दर 62 हजारांच्या घरात होता. कालही पुण्यात चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानुसार दोन दिवसांत चांदीचा दर 1100 रुपयांनी वाढला आहे.
याआधी 17 ऑगस्टला चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती. एका दिवसांत चांदीचा दर 900 रुपयांनी वाढला होता. त्यावेळी एक किलो चांदीचा दर 63,600 रुपयांवर गेला होता.
सोने 50,000 रुपयांपर्यंत जाणार
तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. गुंतवणूकदार YOLO मेटलमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.
संबंधित बातम्या :