Pune Gopichand Padalkar : दुसऱ्या रस्त्यानं घेऊन जातात अन् म्हणतात बारामतीचा विकास झाला; पुरंदरमधल्या मोर्चात पडळकरांची पवारांवर टीका

शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही नाही. बारामतीच्या 42 गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले. बारामतीतील या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Pune Gopichand Padalkar : दुसऱ्या रस्त्यानं घेऊन जातात अन् म्हणतात बारामतीचा विकास झाला; पुरंदरमधल्या मोर्चात पडळकरांची पवारांवर टीका
भाजपा नेते गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:43 PM

पुरंदर, पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बारामतीला जाताना एका ठराविक रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जातात आणि म्हणतात, बारामतीचा विकास झाला, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. ते पुरंदर याठिकाणी बोलत होते. पडळकरांच्या नेतृत्वात महाविका आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी त्यांनी पवारांवर टीका केली तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. या राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन (Electricity) तोडणी तात्पुरती थांबवली आहे. मात्र राज्यात लोडशेडिंग सुरूच आहे. आठ-आठ तास भारनियमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

तहसील कार्यालयावर मोर्चा

पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून 220 केबीची लाइन जाते. यात राष्ट्रवादीचे काही दलाल असून ते या सर्वांना पाठीशी घालत आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बागायत शेतातून या टॉवरची लाइन टाकायचे चालू आहे. या सर्वांचा विरोध म्हणून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत असल्याचे पडळकरांनी सांगितले.

पाणीप्रश्नावर काय म्हणाले पडळकर?

‘ओबीसी आरक्षणाचा खून करायचा होता’

महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाचा खून करायचा होता, तो त्यांनी केला आहे. ओबीसी आयोगाला पैसे दिले नाहीत. इतके दिवस सरकार झोपा काढत होते का, असा सवाल करत सरकारमधील काही लोकांना ओबीसींच्या जागा बळकावयाच्या आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी सरकारवर केला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांवर टीकास्त्र

बारामतीचा विकास झाला की नाही, यावर गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात विकास झाला, असे सांगतात, असा आरोप पडळकरांनी केला. शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही नाही. बारामतीच्या 42 गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले. बारामतीतील या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत. अजित पवार आज सत्तेत आहेत, उद्या ते सत्तेत नसतील. उद्या देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.