AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल चॅलेंज अन् आज ॲक्शन… ; अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात

Ajit Pawar in Shirur Loksabha Constituency After giving to challenge Amol Kolhe : काल अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. अजित पवार नेमकं काय म्हणाले? त्यांनी काय चॅलेंज दिलं होतं? वाचा...

काल चॅलेंज अन् आज ॲक्शन... ; अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 8:27 AM

हडपसर, पुणे | 26 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून आणणार, असं अजित पवार म्हणालेत. त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते.

अजित पवारांकडून विकासकामांची पाहणी

अजित पवार यांनी आज हडपसरमध्ये जात विकासकामांची पाहणी केली. मांजरी पाणीपुरवठा योजनेची शिवाय मांजरी रेल्वे गेट पुलाच्या कामाची पाहणी अजित पवारांनी केली. 2017 पासून या पुलाचं काम सुरू आहे. पुलाचे बांधकाम चुकीचं झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. शिवाय ज्यांची जमीन गेली आहे. त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही. या पुलावर आतापर्यंत 10 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या पुलाची आज अजित पवार यांनी पाहणी केली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

काल तुम्ही चॅलेंज दिलं. त्यानंतर आज तुम्ही शिरूर मतदारसंघात आला आहात, असा प्रश्न विचारताच अजित पवार यांनी त्याला उत्तर दिलं. काल दिलेल्या चॅलेंजचा आणि आज केलेल्या पाहणीचा काहीही संबंध नाही. आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनादरम्यान या कामाची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मी आज इथं आलो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी पाहणी केली, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचं चॅलेंज काय?

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता थेट घणाघात केला. कोल्हेंना निवडणुकीत पाडणारअ असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यासमोर त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांचं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.