Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये, पुणे भाजपमध्ये नाराजीनाट्य?

| Updated on: Jul 04, 2023 | 10:39 AM

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले आहे. अजित पवार भाजप-शिवसेना युतीसोबत आले. त्यानंतर सर्व काही आलबेल आहेत, असे नाही. पुण्यातील भाजपचे काही नेते नाराज झाले आहे.

Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये, पुणे भाजपमध्ये नाराजीनाट्य?
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट तयार झाले. त्यातील अजित पवार यांचा गट शिवसेना-भाजप यांच्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. परंतु अजित पवार यांच्या आगमनामुळे पुणे भारतीय जनता पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबाशी नेहमी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेला मोठा नेता नाराज झाला आहे. अजित पवार नको म्हणून भाजपमध्ये सहभागी झालेला हा नेता आता नाराज झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे नाराज

अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज झाले आहेत. त्यात इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची पंचाईत झाली आहे. पुणे जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधात राहिले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड होणे अवघड आहे.

हे सुद्धा वाचा

का आहेत नाराज

माजी खासदार शंकरराव पाटील याचे पुतणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील. त्यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवार यांचा बारामती मतदार संघ जवळजवळ आहे. हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ मध्ये काँग्रेसकडे उमेदवारी मगितली होती. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरी केली. त्यावेळेपासून पवार घराणे आणि पाटील यांच्यात विळ्या भोपळयाचे सख्य आहे. आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार ही जोडी जमणे अवघड आहे. यामुळे आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पुणे जिल्ह्यात वाढणार आहे.