‘त्या’ हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते सुनील तटकरे, पण…

यात तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'त्या' हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणार होते सुनील तटकरे, पण...
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 10:25 AM

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, त्याच हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी 7.30 वाजता एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यानंतर हे हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून जात होते. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हा अपघात झाला.

पुण्यात अपघात झालेले हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.

यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधूनच प्रवास करणार होते, पण…
सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधूनच प्रवास करणार होते, पण….
हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल अन् अवघ्या 3 मिनिटांत कोसळल, पुण्यात दुर्घटना
हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल अन् अवघ्या 3 मिनिटांत कोसळल, पुण्यात दुर्घटना.
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.