सुनील टिंगरे मध्यरात्री पोलीस स्टेशनला का गेले? खरं कारण आलं समोर

"मी इंजिनिअर असताना विशाल अग्रवाल यांच्याकडे कामाला होतो. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे नोकरीला होतो", असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

सुनील टिंगरे मध्यरात्री पोलीस स्टेशनला का गेले? खरं कारण आलं समोर
आमदार सुनील टिंगरे यांचं पुण्यातील अपघाताच्या घटनेवर सविस्तर स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:17 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. अपघाताची घटना घडली त्या रात्री सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्यावर काही जणांकडून आरोप केले जात आहेत. या आरोपांवर सुनील टिंगरे यांच्याकडून वारंवार स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तरीही आरोप करणारे थांबत नसल्याने आता सुनील टिंगरे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासोबत आपले काय संबंध आहेत? या विषयी मोठा खुालासा केला आहे. “मी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे”, असा खुलासा सुनील टिंगरे यांनी केला आहे.

“मी इंजिनिअर असताना विशाल अग्रवाल यांच्याकडे कामाला होतो. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे नोकरीला होतो. लोकप्रतिनिधी म्हणून कुणाचाही मला फोन येतो. मी अपघात घडल्यानंतर पीआय यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. सर्व सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे. मी पूर्ण घटनेची जानकारी घेतली होती”, अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली.

‘विशाल अग्रवाल यांचा फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली’

“माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी माझ्या पीएचा फोन आला की, मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्ते तिथे असल्याची माहिती मिळाली. तसेच विशाल अग्रवाल यांचादेखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. त्यामुळे मी पोलीस स्टेशनला पोहचलो. त्यानंतर पोलिसांनी मला माहिती दिली. मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो. मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतलीय. मी मृतांच्या नातेवाईकांना मदत केली. मी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी करतोय”, अशी भूमिका सुनील टिंगरे यांनी व्यक्त केली.

“मला पहाटे 3 वाजून 21 मिनिटांनी माझ्या पीएचा माझा फोन आला होता. तसेच विशाल अग्रवालांचा मला फोन आला होता. विशाल अग्रवालांचा मला फोन आल्यानंतर मी घटनास्थळी गेलो. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी पीआय पोलीस स्टेशनला नव्हते. जखमींना घेवून हॉस्पिटलला गेले होते. पीआय साहेबांनी सांगितलं मी पोलिस स्टेशनला येत आहे. प्रत्यक्षदर्शीनी त्यांना माहिती दिली होती. आपण कायदेशीर कारवाई करावी, असं सांगितलं. साहेबांना सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करावा”, असा खुलासा सुनील टिंगरे यांनी केला. “काही लोक पब संदर्भात बोलत होते. मी विधीमंडळात पब संदर्भात आवाज उठवला होता. सर्व सभासदांसह मी मंत्र्यांची भेट घेतली होती. कित्येकवेळा पत्रव्यवहारही झालेला आहे”, असं सुनील टिंगरे यावेळी म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.