पुण्यात पुन्हा हिट अँड रन, वेगवान कारची दुचाकीला धडक; पोलिसाचा जागीच मृत्यू

पुण्यात काल मध्यरात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाला आहे. तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन, वेगवान कारची दुचाकीला धडक; पोलिसाचा जागीच मृत्यू
पुणे हिट अँड रन अपघात
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 9:45 AM

Pune Hit And Run Case Police died : मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनच्या घटनेनंतर आता पुण्यातही हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात काल मध्यरात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाला आहे. तर एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. हे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.

रात्रीची गस्त घालण्यासाठी गेलेले असताना अपघात

पुण्यात काही महिन्यांपूर्वी पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यात काल मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या हॅरिस ब्रीजखाली दोन पोलीस रात्रीची गस्त घालण्यासाठी गेले होते. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस अधिकारी दुचाकीवरुन हॅरिस ब्रीजखाली जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका वेगवान चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली.

एका पोलिसाचा मृत्यू, एक जखमी

ही धडक इतकी जबरदस्त होती की यात समाधान कोळी या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर पी.सी. शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

आरोपीचा शोध सुरु

तर दुसरीकडे या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक हा गाडी घेऊन फरार झाला आहे. सध्या पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातातील गाडी कोणाची होती, ती कोण चालवत होतं, तो व्यक्ती अल्पवयीन होता का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.