Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकरचे नाशिक कनेक्शन, आणखी कोण आहे रडारवर

Pune News : पुणे येथील डिआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरण गंभीर वळन घेत आहे. हा प्रकरणात नाशिक कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. यामुळे पुणे एटीएसने नाशिक पोलिसांना दोन नंबर पाठवून त्यांची चौकशी करण्याच्या सूचना केल्याय.

Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकरचे नाशिक कनेक्शन, आणखी कोण आहे रडारवर
Honey trap
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:16 AM

प्रदीप कापसे, पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले. एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली. आता कुरुलकर याला १४ दिवसांची न्यायालयानी कोठडी मिळाली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे. दरम्यान कुरुलकर यांच्या चौकशीतच हवाई दलाचा एक अधिकारी देखील हनीट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो सध्या बंगळुरुमध्ये आहे. कुरुलकरनंतर शेंडे अशी दोन प्रकरणे उघड झाल्यानंतर आता नाशिक कनेक्शन समोर येत आहे.

काय आहे नाशिक कनेक्शन

पुणे एटीएस पथकाला प्रदीप कुरुलकर यांचे नाशिक कनेक्शन दिसून येत आहे. एटीएसने त्याद्दष्टिने तपास सुरु केला आहे. एटीएसनं या प्रकरणात नाशिक पोलिसांना दोन मोबाईल नंबर पाठवले आहे. या नंबरवर तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते दोन मोबाईल नंबर कोण वापरत होते ? याचा तपास सुरू झाला आहे. यामुळे कुरुलकर प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

११ जणांचे जबाब

आतापर्यंत कुरुलकर प्रकरणात 11 जणांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्याअनुषंगानेही तपास सुरु आहे. तसेच कुरुलकर याला न्यायालयीन कोठडी दिली असली तरी त्याची गरजेनुसार चौकशी होणार आहे.

पॉलीग्रॉफी चाचणी होणार

DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलीग्राफी टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. एटीएसला टेस्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. काल पुणे न्यायालयाने कुरुलकरला एक दिवसांची कोठडी सुनावली आहे.

नातेवाईकांच्या चौकशीची मागणी

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रदीप कुरुलकर प्रकरणात त्याच्या नातेवाईकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दवे म्हणाले की, “प्रदीप कुरुलकर खरंच दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या नातेवाईकांवर सुद्धा ज्यांना आपण स्लीपर सेल म्हणू शकतो, त्यांना माहिती होतं की, आपल्या घरातला कर्ता पुरुष काय उद्योग करतोय, येणारे पैसे कसे येत आहेत हे माहिती असूनही त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्या सुद्धा मालमत्ता जप्त व्हायला पाहिजेत”.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.