पोलिसांनी या सिंपल स्टेपने प्रदीप कुरुलकरचे व्हॉट्सॲप चॅट केले रिकव्हर

Pune News : पुणे येथील डिआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले. जो मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत डिकोड झाला नाही, तो पोलिसांनी डिकोड केला. त्यासाठी साध्या स्टेपच्या वापर केला, ज्या स्टेप आपण सर्वांना माहीत आहे.

पोलिसांनी या सिंपल स्टेपने प्रदीप कुरुलकरचे व्हॉट्सॲप चॅट केले रिकव्हर
honey trap whatsapp decode
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:28 AM

प्रदीप कापसे, पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले. एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात त्याचा मोबाइलमधील डाटा रिकव्हर करणे गरजेचे होते. त्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. परंतु फॉरेन्सिक लॅबला मोबाईल डीकोड करता आला नाही. कुरुलकर याने व्हॉट्सॲप अँप्लिकेशन डीलीक केल्यानं हे शक्य झालं नाही. परंतु पोलिसांनी मोबाइलचा डेटा रिकव्हर केला. एक साधी स्टेप वापरत पोलिसांनी हा डेटा रिकव्हर केला.

काय केले पोलिसांनी

प्रदीप कुरुलकर याचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रिकव्हर झाला नाही. मग पोलिसांनी कुरुलकर याचे सीमकार्ड त्याच्या मोबाइल oneplus 6tमध्ये टाकून रितसर पासवर्डद्वारे मोबाईल सुरु केला. त्यानंतर व्हॉट्सॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याचा बॅकअप घेतला. त्यामुळे सर्व चॅट रिकव्हर झाले. एटीएसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. चॅटमधून पाकिस्तानी हेराशी संभाषण झालं असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. एटीएसनं मोबाईल सुरू केल्यानंतर चॅट संभाषण हाती लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

कुरुलकरचे नाशिक कनेक्शन

पुणे एटीएस पथकाला प्रदीप कुरुलकर यांचे नाशिक कनेक्शन दिसून येत आहे. एटीएसने त्याद्दष्टिने तपास सुरु केला आहे. एटीएसनं या प्रकरणात नाशिक पोलिसांना दोन मोबाईल नंबर पाठवले आहे. या नंबरवर तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते दोन मोबाईल नंबर कोण वापरत होते ? याचा तपास सुरू झाला आहे. यामुळे कुरुलकर प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवाईदलाचा अधिकारी अडकला हनी ट्रॅप प्रकरणात ११ जणांचे जबाब नोंदवले गेले आहे. या प्रकरणी चौकशीतून हवाईदल अधिकारी निखिल शेंडे हा सुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने संपर्क साधल्याची माहिती कुरुलकर याच्या चौकशीतून समोर आलीय. कुरुलकर याने मोबाईलवरुन पाकिस्तानी महिलेचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्याला निखिल शेंडे याचा मेसेज आला होता. मला का ब्लॉक केलेस? असा मेसेज शेंडे यांनी कुरुलकर यांना पाठवला होता.

एटीएसच्या पथकाने हवाई दलाचे अधिकारी निखिल शेंडे यांच्याकडे चौकशी केली असता शेंडेही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरण गंभीर असल्याने भारतीय वायुसेनेचे गुप्तचर पथक निखिल शेंडेची चौकशी करत आहे.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.