पुण्यातील IAS ने दोन भेटीनंतरच केले टीव्ही कलाकाराशी लग्न, वाचा त्यांची लव्ह स्टोरी

कठोर परिश्रम करुन आयएएसपर्यंत मजल मारणाऱ्या अधिकाऱ्यांची लग्न चर्चेत असतात. पुण्यातील एका आयएएसचे लग्न चर्चेत आले होते. त्यांनी कोणत्या आयएएस अधिकाऱ्याशी नाही तर दूरचित्रवाणी कलाकाराशी लग्न केले होते. लग्नाच्या बारा वर्षानंतर हे दोन्ही जण...

पुण्यातील IAS ने दोन भेटीनंतरच केले टीव्ही कलाकाराशी लग्न, वाचा त्यांची लव्ह स्टोरी
ias marriage
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 12:37 PM

पुणे : आयएएस अधिकाऱ्यांची लग्न चर्चेत असतात. अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS पाहतात. अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा घटस्फोटदेखील होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी यांचे लग्न चर्चेत होते. त्यांनी दुसरे लग्न 2015 च्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या अतहर खान यांच्याशी लग्न केले होते. ते दोघे आएएसच्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात (Love) पडले होते. आता पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहूया.

कोण आहे ती IAS

पुण्यातील या आयएएसने कोणत्या अधिकाऱ्याशी नाही तर कलाकाराशी लग्न केले आहे. या महिला आयएएसचे नाव आहे स्मिता गेट अन् तिने ज्याच्याशी लग्न केले तो कलाकार आहे नीतीश भारद्वाज. दोघांचे हे दुसरे लग्न होते. एका लग्न समारंभात दोघे एका कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले. मग दोघांची प्रेमकथा तयार झाली. परंतु ही प्रेमकथा जरा वेगळी आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात झाला जन्म

IAS स्मिता गेट यांचा जन्म पुण्यात झाला. पुणे शहरातील सेंट्रल स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. पुणे जाऊन सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून 12 वी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी आणि गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समधून समाजशास्त्रात एमए केले.

नितीश भारद्वाज म्हणजे मालिकेतील कृष्ण

नितीश भारद्वाज यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली. या दोघांची भेट कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. मग दोन ते चार भेटींमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

2009 मध्ये लग्न केले

नितीश भारद्वाज आणि स्मिता गेट यांचा विवाह १४ मार्च २००९ रोजी झाला. या दोघांचे हे दुसरे लग्न होते. नितीश व स्मिता यांना जुळ्या मुली आहेत. देवयानी आणि शिवरंजनी अशी त्यांची नावे आहेत. 2022 मध्ये नितीश भारद्वाज यांनी IAS स्मिता गेटशी घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. त्याचे कारण त्यांनी दिले नव्हते. परंतु आम्ही 12 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.

हे ही वाचा

परिवाराने अभ्यास सोडायला सांगितला, वडील शाळेत गेले अन् शिक्षकाला म्हणाले नाव काढून टाका, तोच बनला देशातील युवा IAS

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.