Pune rain : 28 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार? पुण्यातल्या काही भागांत मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

26 जुलैपर्यंत पुण्याच्या आसपासच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Pune rain : 28 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार? पुण्यातल्या काही भागांत मुसळधार, हवामान विभागाचा इशारा
लोणावळा पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 3:17 PM

पुणे : पुण्यात पावसाची (Pune rain) तीव्रता वाढणार आहे. 25 जुलैपर्यंत पुणे शहराच्या हद्दीत आणि आसपासच्या घाट भागात पावसाची तीव्रता वाढेल आणि या कालावधीनंतर कमी होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. शनिवारी पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, लोहेगाव या भागात पाऊस झाला नाही. शिवाजीनगरमध्ये केवळ 0.5 मिमी पाऊस झाला. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) म्हणाले, की अरबी समुद्रातील वातावरणात बदल झाला आहे. शनिवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात ढगांचे आच्छादन काहीसे जास्त प्रमाणातच होते. साहजिकच पावसाची शक्यताही त्यामुळे अंशतः वाढणार आहे. अंदाजामध्ये आम्ही 26 जुलैपर्यंत हलक्या पावसाचा उल्लेख केला असला तरी तो हलक्या पावसाच्या वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यापेक्षा किंचित जास्त असू शकतो, असे ते म्हणाले.

मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रातील पश्चिमेकडील प्रवाह अंशतः मजबूत झाल्यामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसर पुन्हा पावसाच्या पाण्याने युक्त होणार आहे. 26 जुलैपर्यंत पुण्याच्या आसपासच्या घाट भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. घाटात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कश्यपी यांनी दिली. 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. कोकण आणि गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 24 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 25 जुलैपर्यंत विदर्भासाठी हा इशारा कायम राहील, असे कश्यपी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

राज्यात मान्सूनचा पाऊस कमी

जुलैच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस न झालेल्या देशातील सर्व प्रदेशांमध्ये आता काही प्रमाणात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये वायव्य भारतातील प्रदेशांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 23-25 ​​जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या काळात पश्चिमेकडील वारे पुन्हा जोरात येण्याची शक्यता आहे, असेही कश्यपी म्हणाले.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.