Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD prediction | या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज, वाचा कोणत्या जिल्ह्यात असणार पाऊस

राज्यात अवकाळी पावसाचे संकट अजूनही आहे. आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडासंदर्भात हा अंदाज आहे.

IMD prediction | या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज, वाचा कोणत्या जिल्ह्यात असणार पाऊस
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 1:23 PM

पुणे : मार्च महिना अवकाळी पावसात गेला. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस

४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्मिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ आणि ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ आणि ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

का पडतोय पाऊस?

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस होत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच उत्तर-पश्चिमेकडे पाऊस होत आहे. एप्रिल महिन्यात हिच परिस्थिती आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भारतातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. हा अवकाळी पाऊस शेतीसाठीही फायदेशीर नाही आणि आरोग्यासाठीही नाही.

ला- नीनाचा प्रभाव

देशात पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत ला नीना सकारत्मक आहे. मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण असल्याचे डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हा अंदाज आम्ही 15 एप्रिल रोजी जाहीर करणार आहोत.

मार्चमध्ये कुठे कुठे पाऊस

साधारणपणे मार्चमध्ये पाऊस होत नाही. मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो. पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यातही पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत पाऊस झाला. चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

हे वाचा

पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन? अन् सर्वच लागले कामाला

पुणे शहरात वाहने वाढली अन् अपघातही, अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या मोठी

पुणे शहरात वाहन खरेदीत मोठी वाढ, कोणत्या वाहनांना आहे पुणेकरांची पसंती?

राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.