Indapur Election Result 2024 LIVE Updates : इंदापूरमध्ये धक्कादायक निकाल; माजी मंत्र्यांचा दारूण पराभव
Indapur MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates : राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रविण माने यांच्या झालेल्या लढतीचा आज निकाल लागतोय.
महाराष्ट्रातील 288 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. कुणाचं सरकार राज्यात येणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींमध्ये इंदापूरचा नंबर वरचा लागतो. दोन माजी मंत्र्यांमध्ये झालेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार गटाकडून माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले प्रविण माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
शेवटची फेरीने भवितव्य ठरवलं
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये कोण जिंकणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. तर माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 19 हजार 410 मतांनी दत्तात्रय भरणे विजयी झाले आहेत. 26 पैकी 26 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे. शेवटच्या फेरीपर्यंत दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. या शेवटच्या फेरीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झालेला आहे.
मागच्या पाच वर्षात इंदापूरची राजकीय समीकरणं बदलली
2019 च्या निवडणुकीवेळी राज्यातील समीकरणं बदलली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश होता. पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. आता 2024 मध्ये पुन्हा एकदा इंदापूरमधील राजकीय परिस्थिती बदलली. अजित पवार समर्थक भाजपसोबत गेले. तेव्हा इंदापूरचे विद्यमान आमदार दत्ता भरणे हे देखील महायुतीत सामील झाले.
हर्षवर्धन पाटलांना तिकीट, माने नाराज
2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा चित्र बदललं. जागा वाटपात इंदापूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. यातच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा संपर्क झाला. महाविकास आघाडीकडून तिकीट फायनल होताच हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या हातात हात दिला.हर्षवर्धन पाटील यांचं तिकीट फायनल झालं खरं पण यामुळे संघर्षाच्या काळात शरद पवारांसोबत राहिलेले सोनाई दूध संघाचे संचालक प्रविण माने हे नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे यंदा इंदापूरमध्ये तिरंगी लढत झाली.
इंदापूर विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting
विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE