पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात नुकतेच आयटी अभियंत्याचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला होता. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत मिळाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील तरुणाच्या खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन तपास नियुक्ती केली होती. या प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पुणे शहरातील हिंजवंडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत सौरभ नंदलाल पाटील ( वय 23) हा कार्यरत होता. परंतु त्याच्या शिक्षणाशी निगडीत त्याला काम मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. तो नोटीस पिरियडवर होता. सौरभ 28 जुलैपासून बेपत्ता होता. 5 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत मिळाला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी तीन पथके नेमली.
पोलिसांनी सौरभ पाटील खून प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी खेड येथून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी पुणे शहरात आणले आहे. ही हत्या रिलेशनशीपमुळे झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. परंतु अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सौरभ पाटील बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असताना 5 ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर खेड तालुक्यात असलेल्या होलवाडी गावात त्याची दुचाकी मोटारसायकल सापडली. घटनास्थळाच्या जवळच गाडीची चावी मिळाली. आता या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीतून खुनाचे कारण समोर येणार आहे.