बदलीमुळे नाराज कारागृह अधीक्षकाची इच्छा मरणाची मागणी; सरकारची डोकेदुखी वाढणार?
पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. (pune jail superintendent requested for euthanasia to maharashtra government)

पुणे: पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. तडकाफडकमी बदली झाल्याने नाराज झालेल्या पुण्यातील कारागृह अधीक्षकाने इच्छा मरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. (pune jail superintendent requested for euthanasia to maharashtra government)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकरणाची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सरकारभोवती संकटाचं हे वादळ घोंगावत असतानाच पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधवि यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली होत असेल तर मला इच्छा मरण द्यावे, असं म्हटलं आहे.
बदल्यांसाठी अर्थकारण
माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. गृहखात्यातील अर्थकारणामुळेच हा प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप करत मला इच्छा मरणाची परवानगी न दिल्यास परवानगी असल्याचं गृहित धरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बदलीमुळे सिंगही नाराज?
सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यांना होमगार्डचे प्रमुख केले होते. मात्र ही आपली पदावनती असल्याने सिंग नाराज झाले होते. तसेच सिंग यांची बदली करताना त्याचे कारणही दिले नव्हते. आपल्याला होमगार्ड सारखं दुय्यम दर्जाचं डिपार्टमेंट देणं ही शिक्षा असल्याची भावना निर्माण झाल्यानेच त्यांनी थेट गृहमंत्र्यांचे कारनामे एका लेटरद्वारे बाहेर काढले होते, असं सूत्रांनी सांगितलं.
फडणवीसांचा गौप्यस्फोट
सिंग यांचे आरोप ताजे असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील बदली रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या एका अहवालचा हवाला देत फडणवीस यांनी राज्यात मोठं बदली रॅकेट असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी काल त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना भेटून पुरावे दिले होते. तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती. (pune jail superintendent requested for euthanasia to maharashtra government)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/363zMEtrB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलत करावं : देवेंद्र फडणवीस
फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्याला वातही नव्हती; राऊतांची खोचक टीका
Corona Cases and Lockdown News LIVE : नंदूरबार जिल्ह्यात दोन दिवसात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू
(pune jail superintendent requested for euthanasia to maharashtra government)