Who is Dhangekar?: पुण्यातील कसाबा पेठेत पुन्हा चर्चेची लढत, रवींद्र धंगेकर यांना भाजपचा हा उमेदवार देणार फाईट

कसबा पेठेतील गेलेली जागा पुन्हा मिळवण्याचे आव्हान भाजपकडे आहे. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून जोरदार लढत मिळणार आहे. यंदा भाजपचा पारंपारीक मतदार पुन्हा पक्षाकडे येणार का? हे आता 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

Who is Dhangekar?: पुण्यातील कसाबा पेठेत पुन्हा चर्चेची लढत, रवींद्र धंगेकर यांना भाजपचा हा उमेदवार देणार फाईट
रवींद्र धंगेकर
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 10:18 AM

pune kasba peth election: पुणे शहरातील कसबा पेठेतील पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. भारतीय जनता पक्षाच्या या पारंपारीक मतदार संघात काँग्रेसने सुरुंग लावले होते. भाजपने प्रचारात ‘हू इज धंगेकर?’, असा प्रचार विधानसभा पोटनिवडणुकीत केला होता. त्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपला जोर लावावे लागणार आहे. या मतदार संघात भाजपने रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात हेमंत रासने यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव आले आहे.

असा आहे कसबा पेठचा इतिहास

कसबा पेठे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत होते. या मतदारसंघातून स्व.मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व.अण्णा जोशी, स्व.डॉ अरविंद लेले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी असलेल्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे 2023 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपच्या पारंपारीक मतदार संघात पक्षाने ब्राम्ह्यण समाजाचा उमेदवार न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हा समाज नाराज होता. पुण्यात बॅनर लागले होते. त्यात म्हटले होते की, . ‘कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का?’

भाजपने सर्व ताकद लावली पण…

कसबा पेठेत ब्राम्ह्यण समाजाची नाराजी पाहून हेमंत रासने यांच्या विजयासाठी भाजपने पोटनिवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अख्खे मंत्रिमंडळ प्रचाराला आले होते. त्यानंतर रवींद्र धगेंकर यांचा 11 हजार मतांनी विजय झाला होता. रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 62,394 मते मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

आता कसबा पेठेतील गेलेली जागा पुन्हा मिळवण्याचे आव्हान भाजपकडे आहे. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून जोरदार लढत मिळणार आहे. यंदा भाजपचा पारंपारीक मतदार पुन्हा पक्षाकडे येणार का? हे आता 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.

पुण्यातील हे उमेदवार जाहीर

भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील खडकवासलामधून भीमराव तापकीर यांना तर पुणे छावणीमधून सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यामान आमदारांनाच भाजपने तिकीट देत कोणताही धोका पत्कारला नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.