प्रचारामध्ये सामील व्हा, अन् मिळवा सात हजार रुपये

कसबा पोटनिवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. परंतु याच प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी आता नेत्यांना कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रचारामध्ये सामील व्हा, अन् मिळवा सात हजार रुपये
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 6:47 PM

पुणे   : माघारीची मुदत संपल्यानंतर पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र (Pimpri Chinchwad byelection)स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आता होणार आहे. कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.  कसबा पोटनिवडणुकीला (kasba Peth byelection)सुरुवात झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. परंतु याच प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी आता नेत्यांना कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी व्हा

हे सुद्धा वाचा

दरम्यान आता यासाठी पुण्यातील एका एजन्सीला प्रचारामध्ये लोक गोळा करण्यासाठी चक्क उमेदवाराने कॉन्ट्रॅक्ट दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या एजन्सीने लोकांना पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल सात सात हजार रुपये देणार असल्याचे देखील सांगितले आहे.

कसबा पेटीतील अनेक तरुणांना या एजन्सीच्या वतीने फोन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना सारसबागे जवळील एक ऑफिसमध्ये येण्यास सांगितले जात आहे. तसेच त्यांना पंधरा दिवस प्रचार यंत्रणेमध्ये काम केल्यानंतर सात हजार रुपयांचा मोबदला देऊ असं देखील सांगितलं जातंय

मुलगी – तेजस सर बोलताय ना?

मुलगा – हो बोलतोय

मुलगी – हा सर काल मी तुम्हाला कॉल केला होता ते प्रचारात सहभागी व्हायचंय

मुलगा – मॅडम तुम्ही ऍड्रेस नाही पाठवला आणि काय देणारे वैगरे ते पण नाही सांगितलं

मुलगी – सर ते तुम्हाला इथे ऑफिसमध्ये आल्यावर सांगणार, असे सांगितलं होता ना मी

मुलगा – ऑफिसचा ऍड्रेस पण नाही पाठवला मॅडम तुम्ही, कालच आलो असतो नाहीतर

मुलगी – मग तुम्हाला जमेल का? मी पाठवते लगेच

मुलगा – ठीक चालेल, मला पाठवून द्या ना

मुलगी – हा, पाठवून देते सर म्हणजे तुम्हाला यायला जमेल का? प्रचारात फक्त सहभागी व्हायचंय १५ दिवस आणि त्याचे ७ हजार रुपये तुम्हाला दिले जातील

मुलगा – ठीक मॅडम चालतंय

मुलगी – हा, तुम्ही येणार असेल तर सांग सर तस इथे स्वारगेटला ऑफिस आहे

मुलगा – येतो ना मॅडम तिथे, स्वारगेटला कुठे ऑफिस आहे ते सांगा

मुलगी – स्वारगेटच्या तिथे सारसबाग आहे ना, तिथे ऑफिस आहे आमचं

मुलगा – सरसबागेच्या तिथे ?

मुलगी – हा हा

मुलगा – चालतंय मॅडम येतो

मुलगी – किती वाजेपर्यंत येणारे सर तुम्ही?

मुलगा – एक साधारण थोड्या वेळात आला तर चालेल का? ११, ११:३० पर्यंत ?

मुलगी – हा हा

मुलगी – हो चालेल, ११, ११:३० पर्यंत चालेल

मुलगा – ठीक मॅडम

मुलगी – हा, हो ठीक

मुलगा – हा थँक यू

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....