पुणे पोटनिवडणुकीत सट्टेबाजार तेजीत, कसा ठरवताय भाव?

पुणे पोटनिवडणूक प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहे. यामुळे स्टार प्रचारांची रॅली अन् सभा सुरु आहे. प्रचाराच्या आराखड्यावरुन दोन्ही मतदार संघातील सट्टेबाजार तेजीत आला आहे.

पुणे पोटनिवडणुकीत सट्टेबाजार तेजीत, कसा ठरवताय भाव?
कर्नाटक विधानसभा निवडणूकImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:14 AM

पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहे. यामुळे स्टार प्रचारांची रॅली अन् सभा होताय. प्रचाराच्या आराखड्यावरुन दोन्ही मतदार संघातील सट्टेबाजार तेजीत आला आहे. जसजसे मतदान जवळ येत आहे तसतसे सट्टेबाज आणि बुकीदेखील ॲक्टिव्ह झाले आहेत. चिंचवड मतदारसंघातील निवडणूक रिंगणात २८ उमेदवार आहेत. परंतु भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

या तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्यांसाठी शरद पवार, अजित पवार अन् आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरले. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांच्या बळावर मतदारापर्यंत पोहचले आहे.

हे सुद्धा वाचा

कसबा पेठेचे गणित

कसबा पेठेत भाजपकडून हेमंत रासणे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार हेमंत रासणे यांच्यांत प्रमुख लढत आहे. परंतु हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनीही चुरस निर्माण केली आहे. प्रत्येक पक्षाचे मोठे नेते प्रचारासाठी उतरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात ठाण मांडून आहेत.

राजकीय वातावरण तापले

प्रचार शिगेला पोहोचला असल्यानंतर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावण्यात येत आहेत. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाजांचे लक्ष आहे. कोणाला किती प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो.

मतमोजणीच्या दिवशी मोठी उलाढाल

प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाचा दिवस व मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेजीत असतो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते. कसबा पेठ आणि चिंचवडमधील मतदान येत्या 26 फेब्रुवारी रोजी आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....