Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cow milk rates increased : गाईचं दूध महागलं, दुधाचा खरेदी दर 2 रुपयांनी वाढला, 3 आठवड्यात तिसरी दरवाढ

महागाईचा दिवसागणिक भडका उडत असून त्याचे परिणाम आता दैनंदिन गरजेच्या गोष्टींवर होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला आहे. मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे.

Cow milk rates increased : गाईचं दूध महागलं, दुधाचा खरेदी दर 2 रुपयांनी वाढला, 3 आठवड्यात तिसरी दरवाढ
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:09 AM

पुणे : महागाईचा दिवसागणिक भडका उडत असून त्याचे परिणाम आता दैनंदिन गरजेच्या गोष्टींवर होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीने (Katraj Milk Dairy) गाईच्या दुधाचा (Cow milk) खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला (rates increased) आहे. मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या नव्या निर्णयानुसार कात्रज डेअरी जिल्ह्यातील सोमवारपासून शेतकऱ्यांकडून आता प्रतिलिटर 35 रुपये लिटरने गाईचे दूध खरेदी करणार आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली. आता या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 11 एप्रिलपासून होणार आहे.

अध्यक्षपदी येताच मोठे निर्णय

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्याअध्यक्षपदाची केशरताई पवार यांनी येताच तीनच दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरला दोन रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये देण्याची घोषणा त्यांनी जुन्नर तालुक्यातील एका सत्काराच्या कार्यक्रमात केली. विशेष म्हणजे त्याची अमंलबजावणी येत्या 11 एप्रिलपासून होणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष पवार यांनी सांगितले आहे.

कशी झाली दरवाढ?

मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली.

खासगी-सहकारी संघांमध्ये स्पर्धा

दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असली तरी पुणे शहरातील दूध विक्री दर मात्र आहे तेच राहणार आहेत. दुधाची तूट भरून काढण्यासाठी विविध दूध संस्थांमध्ये दूध खरेदी दर वाढीची स्पर्धा लागल्याचं दिसतंय.  दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच संस्थेला दूध द्यावे, या उद्देशाने खासगी आणि सहकारी दूध संघांनी खरेदी दर वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच दूध खरेदी दरात कधीही प्रतिलिटर 30 रुपयांच्या वर न जाणाऱ्या दूध संघांनी देखील खरेदी दर 35 रुपयांपर्यंत नेले आहेत.

इतर बातम्या

Insurance Policy : फ्रीलान्सरच्या आयुष्याला आहे की मोल ! अस्थायी कामगारांसाठी इश्योरटेक विमा कंपन्या सरसावल्या

देशात कोरोना नियंत्रणात असताना दिल्लीत रुग्णांमध्ये वाढ… त्यावर तज्ज्ञ म्हणतात…

तुम्ही सतार वाजवायचे, संगीत शिकायचे सोडा आणि तुम्ही लेखक व्हा, असा सल्ला रणजित देसाईंना दिला, अन् ते स्वामीकार झाले…

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.