पुणे : महागाईचा दिवसागणिक भडका उडत असून त्याचे परिणाम आता दैनंदिन गरजेच्या गोष्टींवर होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीने (Katraj Milk Dairy) गाईच्या दुधाचा (Cow milk) खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला (rates increased) आहे. मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या नव्या निर्णयानुसार कात्रज डेअरी जिल्ह्यातील सोमवारपासून शेतकऱ्यांकडून आता प्रतिलिटर 35 रुपये लिटरने गाईचे दूध खरेदी करणार आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली. आता या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 11 एप्रिलपासून होणार आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्याअध्यक्षपदाची केशरताई पवार यांनी येताच तीनच दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरला दोन रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये देण्याची घोषणा त्यांनी जुन्नर तालुक्यातील एका सत्काराच्या कार्यक्रमात केली. विशेष म्हणजे त्याची अमंलबजावणी येत्या 11 एप्रिलपासून होणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष पवार यांनी सांगितले आहे.
मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान,जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत केशरताई पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला लिटरमागे त्यांनी 2 रुपये वाढवून तो 33 रुपयांऐवजी 35 रुपये इतका देण्याची मोठी घोषणा केली.
दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असली तरी पुणे शहरातील दूध विक्री दर मात्र आहे तेच राहणार आहेत. दुधाची तूट भरून काढण्यासाठी विविध दूध संस्थांमध्ये दूध खरेदी दर वाढीची स्पर्धा लागल्याचं दिसतंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच संस्थेला दूध द्यावे, या उद्देशाने खासगी आणि सहकारी दूध संघांनी खरेदी दर वाढविण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच दूध खरेदी दरात कधीही प्रतिलिटर 30 रुपयांच्या वर न जाणाऱ्या दूध संघांनी देखील खरेदी दर 35 रुपयांपर्यंत नेले आहेत.
इतर बातम्या
देशात कोरोना नियंत्रणात असताना दिल्लीत रुग्णांमध्ये वाढ… त्यावर तज्ज्ञ म्हणतात…