Pune Kidnapping Case Balewadi | डूग्गू जिथं सापडला, तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील थरार, पाहा काय घडलं?

बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठवडाभरापूर्वी (दि. 11 जानेवारी)ला डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते.

Pune Kidnapping Case Balewadi | डूग्गू जिथं सापडला, तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील थरार, पाहा काय घडलं?
pune duggu cctv
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:49 PM

पुणे : बालेवाडी (Balewadi) परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठवडाभरापूर्वी (दि. 11 जानेवारी)ला डूग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण (Kidnapping) झाले होते. अपहरण झालेला डूग्गू आज सापडला आहे. या अपहरण झाल्यानंतर सर्वत्र डूग्गूची चर्चा होती. डूग्गू पालकांना मिळावा म्हणून सोशल मीडियावरूनही अनेक जणांनी आवाहन केले होते. बालकाच्या अपहरणानंतर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना अपहरणकर्ता डूग्गूला घेऊन जात असतानाचा त्याचा पाठमोरा असलेले फुटेज मिळाले होते. त्यानंतर आताही पोलीसांच्या हाती डूग्गूला आणून सोडणाऱ्या व्यक्तीच सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. डूग्गूला घेऊन येत असताना सीसीटीव्हीमध्ये 2 वाजून 31 मिनिटे झाल्याचे चित्र दिसत आहे.

घटना पुनावळे परिसरातील असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय. या ठिकाणी अपहरणकर्त्यानं डूग्गूचा हात हातात गच्च पकडलाय. तो त्याला घेऊन कुठेतली चाललाय असं दिसतंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कचऱ्याच्या डब्यापलिकडे असणाऱ्या रस्त्यावरून डूग्गूला घेऊन चालत येताना अपहरणकर्ता दिसतो. सर्वसामान्यपणे चालत येत असताना रस्त्यात थांबलेल्या कारच्या पलिकडून तो डूग्गूच्या हाताला धरून चालताना दिसत आहे. या संपूर्ण व्हिडीओ त्यानं डूग्गूचा हात कुठेच सोडलेला नाही. कारसमोर आणि रस्त्याशेजारी असलेल्या भिंतीपलिकडे डूग्गू आणि अपहरणकर्ता चालत गेल्याचे दिसत असून काही क्षणानंतर ते दोघेही थांबले. त्यानंतर कारजवळ येऊन पुन्हा थांबलेत. तर पुन्हा त्या कारजवळ येऊन दोघंही घुटमळत असल्याचं दिसून आलंय. त्यानंतर काही क्षण थांबल्यानंतर कारच्या समोर चालत जाऊन डूग्गूला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या भिंतीपलिकडे सोडून अपहरणकर्ता वेगात पाठमोरा चालत गेल्याचं कैद झालंय. नेमकं मागे त्याला कुणी हाक मारली म्हणून तो मागे आला की आणखी काही झालं, हे मात्र व्हिडीओतून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. यावेळी त्याने चेहऱ्यावर कापड बांधल्याचंही दिसतंय. दुचाकीवरुन स्वर्णवचा जो फोटो समोर आला होता, अगदी हुबेहुब तसाच पोशाख अपहरकर्त्याचा असल्याचंही निदर्शनास आलंय.

दरम्यान ,सीसीटीव्हीत कुठेही मोठी वर्दळ नाही. आसपास दोघांव्यतिरीक्त कुणीच नाही. फक्त त्यांच्या पाठीमागून हळूहळू चालत आलेला एक माणूस दिसतोय. डुग्गूला घेऊन चालत गेलेला अपहरणकर्ता पुन्हा त्या कारजवळ डुग्गूला घेऊन आला. यावेळी कारशेजारून चालणारा माणूस मात्र तिथे थांबला होता. बरोबर 60 सेकंदाचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओनं अनेक सवालही उपस्थित केलेले आहेत.

काय आहेत सवाल?

अपहरणकर्ता डूग्गू याला उचलून नेण्यापूर्वी तो कुठून आणि कसा आला हे पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये मिळाल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, अपहरण ज्या ज्या ठिकाणी पोहचले तिथे पोलिसांना पोहचायला तब्बल सात दिवस उशीर झाला होता. डूग्गूला घेऊन अपहरणकर्ता काही अंतर पुढे गेल्यानंतर मिटकॉन, हाईस्ट्रिट आणि अन्य काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याचेच पोलिसांना समजले आहे. अपहरणकर्ता मिटकॉन, सरळ मार्गाने सना लॉज, तेथून राधा चौक मार्गे वाकड मार्गे, भूमकर चौक, देहूरोड ब्रीज, निगडीतील प्रसिद्ध हॉटेल, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली आणि सोनावणे वस्तीमधील एक दूध डेअरी एवढंच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहे. ११ तारखेचे दुपार पर्यंतचे सोनावणे वस्तीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. पण पोलीस या ठिकाणी १८ तारखेला पोहचले होते. याला कारण म्हणजे जिथे जिथे सीसीटीव्ही बंद होते तेथून पोलिसांचा तपास चार दिशेला विखुरला जात होता. पण त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांना मदतीला घेऊन काही परिसरात एक एक घर अन् घर तपासण्यात आले.

संबंधित बातम्या

Pune Kidnapping Case Balewadi| चिमुरड्या डुग्गू कसा सापडला ; पोलिसांनी शोधले की? अपहरणकर्ता सोडून पळाला? वाचा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Pune : 10 दिवसांनंतर बेपत्ता डूग्गू सापडला, फेसबूकवर युजर्स कुणाला म्हणाले थँक्यू?

Pune Kidnapping Case Balewadi | काळजाचा तुकडा अखेर सापडला! बेपत्ता स्वर्णव चव्हाण अखेर सुरक्षित परतला

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.