Pune accident | वरंध घाटात मोठी दुर्घटना, बस 50 फूट खोल दरीत कोसळली अन्…

pune accident news | पुणे शहरातून कोकणाकडे जाणाऱ्या वरंध घाटात मोठी दुर्घटना घडली. या घाटात ५० फूट खोल दरीत मिनी बस कोसळली. मिनी बस पुण्याहून वरंध घाट मार्गे चिपळूणकडे जात असताना हा अपघात झाला.

Pune accident | वरंध घाटात मोठी दुर्घटना, बस 50 फूट खोल दरीत कोसळली अन्...
bus accidentImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 8:27 AM

विनय जगताप, वेल्हा, पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराजवळील वरंध घाटात शनिवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. भोर-महाड मार्गावरील असणाऱ्या घाटात खासगी मिनी बस एका वळणावर दरीत कोसळली. यामुळे रात्री झोपेत असलेल्या प्रवाशांना हादरे बसले. अचानक काय घडले, त्याची कल्पना येण्यापूर्वीच बस दरीत कोसळली. त्यावेळी बसमधील प्रवाशी प्रचंड घाबरले. खाली नीरा देवधर धरण होते. त्या धरणात बस पडण्यापूर्वी झाडा-झुडपांमध्ये अडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला.

कसा घडला अपघात

पुणे येथील स्वारगेटवरुन भोरमार्गे खासगी 17 सीटर बस (MH 08 AP1530)कोकणात जात होती. शनिवारी रात्री दोन वाजता बस वरंध घाटात होती. त्यावेळी वळणावर बस चालक अजिंक्य कोलते याचे नियंत्रण सुटले. त्यानंतर नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात 50 फूट खोल दरीत बस कोसळली. बस झाडांमध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही बस धरणाच्या पाण्यात गेली असती तर अनर्थ झाला असता. बसमधील 10 ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

स्थानिकांची घटनास्थळी धाव

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बसमधील प्रवाशांना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

धरण पाच फुटांवर होते…

बस कोसळून झाडाझुडपात अडकली. त्या ठिकाणाहून नीरा देवघर धरण अवघ्या 5 फुटांवर होते. बस अडकली नसती तर मोठी दुघर्टना घडली असती. बस अडकल्यानंतर स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून सर्वांना बाहेर काढले. या घटनेत चालक अजिंक्य संजय कोलते (राहणार धनकवडी, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच राजेंद्र लाला मिसाळ (राहणार पद्मावती, पुणे), रमेश तुकाराम महाडिक (राहणार, पुणे), सुभाष कदम राहणार (रा. पुणे), करिष्मा उत्तम कांबळे (राहणार सिंहगड रोड पुणे) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.