पुणे कोयता गँगवर कारवाईनंतर भाजपने काय जारी केलं पोस्टर, कोणाचे केले कौतूक

पुणे पोलिसांनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पोस्टरबाजी सुरु केली आहे. भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे पोस्टर केले आहे. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर केले आहे.

पुणे कोयता गँगवर कारवाईनंतर भाजपने काय जारी केलं पोस्टर, कोणाचे केले कौतूक
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 10:02 AM

पुणे : Pune Crime News कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून कोयते जप्त केली आहेत. पुण्यात होणारी जी-20 परिषद आगामी प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरु केली. आता पोलिसांनी या सर्व गुंडांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मकोकामधील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आराखडा तयार केला होता. त्यानुसार पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन रात्रभर राबवले. त्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ३ हजार ७६४ गुन्हेगारांची चौकशी गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात १३ जणांवर मकोकानुसार कारवाई केली.

भाजपची पोस्टरबाजी पुणे पोलिसांनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पोस्टरबाजी सुरु केली आहे. भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे कौतुक करणारे पोस्टर केले आहे. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर केले आहे.

काय म्हटले पोस्टरमध्ये ‘जनतेची सुरक्षा हीच शिंदे फडणवीस सरकारची हमी!

हे सुद्धा वाचा

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन झाले. गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार आहे, असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तस यासोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हे कायद्याचे राज्य आहे,’ कोयत्याच नाही असा उल्लेख केला आहे.

कोणावर झाली कारवाई

पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहेत. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.

हा आहे म्होरक्या

यातील आरोपी समिर लियाकत पठाण हा टोळी प्रमुख आहे. त्याचे इतर साथीदार शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार यांचेवर पुणे शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....