Pune child vaccination : पुण्यानं गाठला मुलांच्या लसीकरणाचा नवा टप्पा तर नाशिकची आघाडी

पुण्यात कोविड (Covid) लसीकरणाचा (Vaccination) एक नवा टप्पा गाठला गेला आहे. या टप्प्यामध्ये एक लाख तीस हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक वेगळा विक्रमच प्रस्थापित केला गेला आहे.

Pune child vaccination : पुण्यानं गाठला मुलांच्या लसीकरणाचा नवा टप्पा तर नाशिकची आघाडी
7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:25 AM

पुणे : पुण्यात कोविड (Covid) लसीकरणाचा (Vaccination) एक नवा टप्पा गाठला गेला आहे. या टप्प्यामध्ये एक लाख तीस हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक वेगळा विक्रमच प्रस्थापित केला गेला आहे. मात्र पुणे पहिल्या क्रमांकावर नसून नाशिकने (Nashik) यात आघाडी घेतली आहे. नाशिकनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण 36 टक्के लसीकरण आजतागायत झाले आहे. एकूण 39 लाख मुलांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. पुणे, नाशिक यात वेग घेत आहेत. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांतला लसीकरणाचा वेग या दोन शहरांच्या तुलनेत कमी आहे. मुंबईत तर केवळ 38 हजार मुलांचेच लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे. संख्येच्या मानाने हा आकडा कमी आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहराने लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे बनले आहे.

काय म्हणाले लसीकरण अधिकारी?

लसीकरण कमी होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या परीक्षा. 12 ते 14 वयोगटातील परीक्षांमुळे या मुलांचे लसीकरण संथगतीने सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा या मुलांच्या लसीकरणाला वेग येईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले आहेत.

16 मार्चपासून सुरू झाले मुलांचे लसीकरण

केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास परवानगी दिली. त्यानंतर या मुलांचे लसीकरण सुरू झाले. सध्या तरी नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग योग्य आहे. मात्र परीक्षा कालावधीमुळे काहीसा वेग मंदावला आहे. पुण्यात तीन लाख 57 हजार मुलांना लस द्यायची आहे. एका व्हायलमध्ये 20 मुलांना डोस देता येतो; पण तेवढी मुले येईपर्यंत व्हायल फोडली जात नसल्याने मुलांसह पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

आणखी वाचा :

Hanuman Chalisa : वाद टळला… पुण्यातला मनसेचा हनुमान चालिसा कार्यक्रम रद्द

Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला

Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.