पुण्यात धावत्या बाईकवर बिबट्याचा हल्ला, नवऱ्याची शिताफी, दाम्पत्य थोडक्यात बचावलं
प्रसंगावधान दाखवत दत्तात्रय शिंदे यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतरही शिताफीने बाईक न थांबता स्पीडने पुढे नेली. मात्र, यादरम्यान गाडीवर मागे बसलेल्या हौसाबाई शिंदे यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
जयवंत शिरतर टीव्ही९, जुन्नर : पुणे (Pune) जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard attack) सत्र सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ल्या केला आहे. जुन्नर जवळील बोरी बुद्रुक येथील सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ बाईकवरून शिंदे दांपत्य जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रसंगावधान दाखवत दत्तात्रय शिंदे यांनी बिबट्याने हल्ला केल्यानंतरही शिताफीने बाईक न थांबता स्पीडने पुढे नेली. मात्र, यादरम्यान गाडीवर मागे बसलेल्या हौसाबाई शिंदे यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
हा बिबट्या ऊसामध्ये दबा धरून बसला होता. जुन्नर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असुन बहुतांश ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एवढेच नव्हेतर तर बिबट्यानी आता माणसांवर हल्ले सुरू केल्याने जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक गावामधील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर अधिक
जिल्ह्यातील आंबेगाव , शिरूर ,जुन्नर , खेड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक असल्याचे सातत्याने समोर येत आहे. अनेकदा ऊस तोडणी कामगार व शेतकऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. काही दिवसांपूर्वी डिंभे धरणाच्या कालव्यात बिबट्याचा बछडा आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी त्यांला वन विभागाच्या हवाली केले होते.
संबंधित बातम्या :
bull market boomed again| बेल्हेचा बैल बाजार पुन्हा गजबजला ; खिलार जातीच्या बैलांच्या मागणीत वाढ