Pune Lockdown Guidelines : महापौर म्हणतात दुकानं उघडा, आयुक्त म्हणतात नको, सलूनचालकांचं ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है’

Pune lockdown rules : आजपासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र पुण्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये (Beauty Parlor And Saloon) संभ्रमाचे वातावरण आहे.

Pune Lockdown Guidelines : महापौर म्हणतात दुकानं उघडा, आयुक्त म्हणतात नको, सलूनचालकांचं 'कन्फ्युजन ही कन्फ्युजन है'
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 11:30 AM

पुणे : राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत (Maharashtra Lockdown extended) वाढवला असला, तरी अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जिथे रुग्णसंख्या घटत आहेत, तिथे सूट देण्यात आली आहे, तर जिथे रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात नाही, तिथले निर्बंध अजूनही कायम आहेत. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये (Pune Lockdown Guidelines) आजपासून मोठ्या प्रमाणात शिथीलता देण्यात येतेय. आजपासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र पुण्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांमध्ये (Beauty Parlor And Saloon) संभ्रमाचे वातावरण आहे. (Pune lockdown rules confusion in saloon and beauty parlor owners what will open and what remain close at pune)

महापौर म्हणतात दुकाने सुरु मात्र आयुक्त म्हणतात दुकाने बंद यामुळे सलून व्यवसायिक मोठ्या संभ्रमात आहेत. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर आणि प्रिंट मीडियामध्ये काही ठिकाणी सलून बंद आणि काही ठिकाणी सुरु असा उल्लेख आहे. त्यामुळे सर्व सलून व्यवसायिक, ब्युटी पार्लर व्यवसायिक तसेच इतर दुकानदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे.

सरसकट सलून दुकानांना परवागनी द्या

सरकारने जी नियमवाली जारी केली आहे त्यामध्ये कोणती दुकाने बंद आणि कोणती सुरू राहणार याचा उल्लेख करावा, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिक प्रचंड अर्थिक संकटात आहे, त्यामुळे दुकानं सुरु करण्यासाठी सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी सलून अँन्ड ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे.

पुण्यात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार 2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार 3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील. 4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील 5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. 6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. 7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

पुण्यात काय बंद असणार?

1. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार 2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार. 3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

महापौर मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट

संबंधित बातम्या 

Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु

पुण्यात शहरी भागातील सर्व दुकाने उघडणार, पण ग्रामीण भागात निर्बंध कायम

(Pune lockdown rules confusion in saloon and beauty parlor owners what will open and what remain close at pune)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.