पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा फॉर्मूला ठरला, अजित पवार यांच्या बैठकीनंतर महत्वाचा विषय
Pune AirPort | लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात मोठा निर्णय आज घेण्यात आला. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३७ एकर जाग संपादीत केली जाणार आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरासाठी आणखी एक नवीन भेट मिळणार आहे. पुण्यातील नवीन पुरंदर विमानतळाचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही. त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळ सुसज्य केले जात आहे. लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहे. तसेच आता लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात मोठा निर्णय आज घेण्यात आला. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३७ एकर जाग संपादीत केली जाणार आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
निधीचा फॉर्मूला ठरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनसाठी येत आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एअरपोर्ट अथॉरिटी सोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विस्तारीकरणाचा विषय मार्गी लावला. विस्तारीकरणासाठी १३७ एकर जागा संपादीत केली जाणार आहे. त्यासाठी ६० टक्के निधी हा राज्य सरकार देणार आहे. तसेच ४० टक्के निधी हा पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) देणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे.
विमानतळ विस्तारीकरण पूर्ण
पुणे (लोहगाव) विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पास २०१७ मध्ये प्रारंभ झाला. आता त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४७६ कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्घाटनानंतर विमानतळावरील एकूण चेक इन काऊंटर्स ३४ होणार आहेत. तर, पाच एरोब्रिज होतील. तसेच प्रती तास सुमारे २३०० प्रवासी विमानतळावरील सुविधांचा वापर करू शकतील, अशा पद्धतीने विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
नवीन टर्मिनलचे काम पूर्ण
पुणे लोहगाव येथील विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाने नवीन टर्मिनल बांधले आहे. सुमारे 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ त्याचे आहे. त्यात अत्याधुनिक सोयीसुविधांची निर्मिती केली आहे. नवीन टर्मिनलमुळे दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहे. या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. सध्या लोहगाव विमानतळावरुन दररोज ९० विमानांची उड्डाणे होते, परंतु नवीन टर्मिनल सुरु झाल्यावर ही संख्या १२० होणार आहे.
ही ही वाचा
पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी महत्वाचा बदल, नवीन टर्मिनल गाठणे होणार सोपे