Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी लढवणार? काय आहे परिस्थिती

Pune Lok Sabha Election : सन २०२४ ची लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आता पुणे लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत आले आहे.

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी लढवणार? काय आहे परिस्थिती
pm narendra modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 2:40 PM

पुणे | 1 सप्टेंबर 2023 : देशात लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. परंतु विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीसंदर्भात इंडिया टुडे आणि सी-व्होटर्स याचा सर्व्हे आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत झाल्याचे दाखवले तर महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेनुसार विरोधी पक्षातील फुटीचा भाजपला फायदा होणार नसल्याचे संकेत मिळाले आहे.

यामुळे मोदी यांच्या नावाची चर्चा

भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्व्हे केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभेची जागा लढवल्यास ते शंभर टक्के निवडून येतील. तसेच राज्यात भाजपला फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढल्यास महाविकास आघाडीला जोरदार टक्कर मिळले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाढतील, असे भाजपच्या पाहणीत म्हटले आहे.

आता २०२४ ची निवडणूक कोठून लढवणार

मोदी यांनी २०१२ मध्ये वाराणसी आणि वडोदरा येथून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वाराणसीतून निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्यात येऊन गेले. तेव्हा त्यांनी आपले पुण्यावर विशेष प्रेम असल्याचे म्हटले होते. यामुळे २०२४ ची निवडणूक मोदी पुण्यातून लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

माजी खासदार संजय काकडे यांनी पत्र

लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचे नाव आले. दरम्यान संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

काय आहे पत्रात

माजी खासदार संजय काकडे यांनी लिहिल्या पत्रात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या दोन्ही राज्यात भाजपला शंभर टक्के यश मिळाले. आता पुणे लोकसभा मतदार संघात तुमचा विजय १०० टक्के आहे. तसेच यामुळे राज्यातही ९० ते १०० टक्के जागा भाजपाला मिळतील. दरम्यान, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यावर म्हणाले की, पुण्यात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्याविरोधात उभे राहू.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.