पुणे लोकसभा निकाल 2024: लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ सोडली, पण पुणेकरांनी वसंत मोरे यांना नाकारले

Pune Lok Sabha Election Result 2024 News in Marathi: वसंत मोरे यांनी कोरोना काळात पुणेकरांसाठी जबरदस्त काम केले. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधी फोन करतात. लोकांच्या प्रश्नांना दाद सोशल मीडियातून ते मिळवून देतात. त्यामुळे सोशल मीडियातील या हिरोला प्रत्यक्षात पुणेकरांनी साथ दिली नाही.

पुणे लोकसभा निकाल 2024: लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ सोडली, पण पुणेकरांनी वसंत मोरे यांना नाकारले
vasant more and raj thackeray
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 9:00 AM

लोकसभा निवडणुकीचे कल आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे. महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसत आहे. परंतु पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली. परंतु तो प्रयोग यशस्वी होत नसल्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची साथ धरली आणि लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. परंतु या रिंगणात पुणेकरांची पसंत वसंत मोरे ठरु शकले नाही. पुणेकरांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाच साथ दिल्याचे सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कलावरुन दिसूत येत आहे.

वसंत मोरे सोशल मीडियावर प्रसिद्ध पण…

वसंत मोरे यांनी कोरोना काळात पुणेकरांसाठी जबरदस्त काम केले. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधी फोन करतात. लोकांच्या प्रश्नांना दाद सोशल मीडियातून ते मिळवून देतात. त्यामुळे सोशल मीडियातील या हिरोला प्रत्यक्षात पुणेकरांनी साथ दिली नाही. सकाळी ११.३० वाजता भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ८६ हजार मते मिळाली होती. परंतु वसंत मोरे यांना फक्त नऊ हजार मते होते. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ७८ हजार मतांसह स्पर्धेत होते. निवडणुकीच्या कलावरुन वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती आहे.

गेल्या वेळेस वंचितच्या उमेदवारास जास्त मते, आता वसंत मोरे असून कमी मतदान

गेल्या वर्षी पेक्षा यंदा वंचितकडून लढलेल्या वसंत मोरे यांना कमी मतदान झाले आहे. लोकसभा निवडणूक निकलात वसंत मोरे यांना फक्त ३१ हजार मते मते मिळाली. गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला ६३ हजार मते पडली होती. मात्र यंदा वसंत मोरे सारखा तगडा माणूस असूनही मोरे यांना त्यांचा करिश्मा दाखवता आला नाही. ऐनवेळी वंचित पक्षात प्रवेश केल्याने वसंत मोरे यांना वंचितचा मतदारांनी स्वीकारले नाही.

हे सुद्धा वाचा

धंगेकरांची जादू चालली नाही…

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी कसमा विधानसभा पोटनिवडणुकीत जादू केली. भाजपच्या या मतदार संघात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. परंतु लोकसभेत त्याची पुनरावृत्ती रवींद्र धंगेकर करताना दिसत नाही. यामुळे पुणेकरांची पसंती ना वसंत मोरे यांना, ना रवींद्र धंगेकर यांना राहिली आहे. मुरलीधर मोहोळच पुणेकरांची पसंती ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

पुणे लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Pune Lok Sabha Seat Winner History)

पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 49.82 टक्के मतदान झाले होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळविला होता. 2014 मध्ये मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना पराभूत केले होते. अनिल शिरोळे यांनी 3,15,769 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांना 5,69,825 मते तर डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना 2,54,056 मते मिळाली.

साल 2019 मध्ये गिरीश बापट यांना 6,32,835 मते मिळून ते जिंकले. गिरीश बापट यांनी 3,24,628 मतांनी आघाडी घेतली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मोहन जोशी यांना 3,08,207 मते मिळाली. 29 मार्च 2023 रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले होते. त्यानंतर पुणे लोकसभेत पोटनिवडणूक झाली नव्हती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.