तुम्हाला हे एखादं गार्डन वाटू शकतं पण हे गार्डन नाही तर नदी आहे.
लोणवळ्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा हा असा विळखा पडलाय.
तात्काळ नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे करत आहेत.
गेल्या 25 वर्षात इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी अनेक मोहीम राबविण्यात आल्या. मात्र त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत, त्यामुळे इंद्रायणी नदीची ही अशी दुरवस्था झाली आहे.
इंद्रायणी नदी लोणवळ्यामधून उगम पावल्यानंतर आळंदी,देहूनगरी मधून जाते. अनेक भाविक-भक्त ह्या नदीत आचमन करून दर्शन घेत असतात. त्यामुळे नदी स्वच्छ करण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे.