पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार; लवकरच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
Pune Mahanagarpalika | 10 मार्च रोजी महापालिकेच्या मुख्य सभेत सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मंजूरी मिळाली नव्हती. मात्र, हा प्रस्ताव पूर्णत्त्वाला गेला असून लवकरच तशी घोषणा होऊ शकते.
पुणे: यंदाचा गणेशोत्सव पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वर्दी देणार ठरला आहे. कारण येत्या काही दिवसांत पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजाणी होणार आहे. याविषयी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन-तीन दिवसांत तशी घोषणा करु शकतात. एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची सूत्रांची माहिती आहे.
10 मार्च रोजी महापालिकेच्या मुख्य सभेत सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मंजूरी मिळाली नव्हती. मात्र, हा प्रस्ताव पूर्णत्त्वाला गेला असून लवकरच तशी घोषणा होऊ शकते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आणखी एक खुशखबर
महागाई भत्ता (डीए), महागाई आराम (डीआर) आणि भाडे भत्ता (एचआरए) मध्ये वाढ केल्यानंतर मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आणखी एक भेट देऊ शकते. जुलैमध्ये केंद्राने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के आणि घरभाडे भत्ता 24 टक्क्यांवरून 27 टक्के केला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा तीन टक्क्यांनी वाढेल. यामुळे ते 31 टक्के होईल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्राने मे 2020 मध्ये महागाई भत्ता (डीए वाढ) वाढ थांबवली होती.
कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्याच्या उरलेल्या पैशांची मागणी
महागाई भत्त्यात वाढ झाल्यापासून केंद्रीय कर्मचारी डीए थकबाकीची मागणी करत आहेत. 26-27 जून 2021 रोजी राष्ट्रीय परिषद JCM (NCJCM), कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) आणि वित्त मंत्रालय यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. कोरोना महामारीच्या काळात सुमारे दीड वर्षांपासून केंद्राने कर्मचाऱ्यांना 17 टक्के दराने दिला जाणारा महागाई भत्ता बंद केला होता. तज्ञांच्या मते, लेव्हल -1 कर्मचाऱ्यांच्या डीएची थकबाकी 11,880 रुपयांपासून 37,554 रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर, लेव्हल -14 (पे-स्केल) कर्मचाऱ्यांना डीए 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळणार आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार
सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता त्यांना एकाच वेळी ग्रॅच्युइटी, रोख पेमेंट आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. केंद्र सरकारने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ही माहिती दिली आहे. या विभागाने म्हटले आहे की, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही रोख पैसे आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारच्या कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अशीच एक घोषणा नुकतीच करण्यात आली. या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सरकारने DA आणि DR मध्ये वाढ जाहीर केली आहे. कोरोनामुळे सरकारने DA मध्ये केलेली वाढ थांबवली होती, जी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटीचे फायदेही जाहीर करण्यात आले आहेत. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देखील जारी केली आहे. सरकारने एक निवेदन जारी केले आहे ज्यात जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट
सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम
7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार