स्वस्ताचे आमिष पडले महागात, पुण्यातील व्यक्तीने उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यास लाखोंनी गंडवले

तुम्हाला लोखंडी रॉड स्वस्त दरात मिळवून देऊ, असे सांगत विश्वास संपादन केला. स्वस्तात माल मिळत असल्याने लखनऊ येथील व्यापाऱ्याने त्यास होकार दिला.

स्वस्ताचे आमिष पडले महागात, पुण्यातील व्यक्तीने उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यास लाखोंनी गंडवले
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 12:20 PM

लखनऊ : कोणतीही गोष्ट स्वस्तात मिळावून भरपूर नफा कमवण्याची लालच उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यास चांगलीच महाग पडली. लखनौमधील एका व्यापाऱ्यास ३८ लाख रुपयांत फसवल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यक्तीला उत्तर प्रदेश पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. केशव झा असे आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून फसवणुकीची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला लखनऊ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विविध आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढत असताना सर्वसामान्य त्याला बळी पडत आहे.

कशी झाली फसवणूक

पुण्यातील व्यापाऱ्यास केशव झा याने आपण लोखंडी रॉडचे व्यापारी आहोत, असे सांगितले. तसेच तुम्हाला लोखंडी रॉड स्वस्त दरात मिळवून देऊ, असे सांगत विश्वास संपादन केला. स्वस्तात माल मिळत असल्याने लखनऊ येथील व्यापाऱ्याने त्यास होकार दिला. त्यासाठी ३८ लाख रुपये दिले. परंतु पैसे देऊन माल मिळाला नाही.

हे सुद्धा वाचा

यामुळे व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला. आरोपीला पकडण्यासाठी लखनऊ पोलिसांचे पथक पुण्याला आला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी IPC sections 406, 409 trust), 420 (cheating), 504 (insult), आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून ३८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. पोलीस आरोपीला घेऊन लखनऊकडे रवाना झाले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

यापुर्वी महिलेची फसवणूक

पुण्यातील २४ वर्षीय महिला फसवणुकीची बळी ठरली. डिजिटल चोरट्यांनी तिची 11.5 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. जानेवारी २०२३ चा दुसरा आठवडा होता. त्या महिलेला इंस्टाग्रामवरुन एका व्यक्तीने संपर्क केला. त्याने तिला मी भारतीय आहे, पण अमेरिकेत राहतो, असल्याचे सांगितले. त्या दोघांमधील संवाद वाढत गेला. पुढे दोघांनी एकमेकांचे क्रमांक शेअर केले. त्यानंतर इन्स्टाग्रामवरुन सुरु झालेली चर्चा व्हॉट्सअ‍ॅपपर्यंत आली.

मग त्या डिजिटल चोरट्याने “सोने आणि हिऱ्याचे दागिने घ्याल का?” असा प्रश्न विचारला. त्याने पोलंडमधून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणले होते. त्याची तो विक्री करणार होता. हे दागिने तो त्या महिलेला देणार होता. त्यात खरेदी केलेल्या रत्नांसह काही परकीय चलनही होते. महिला दागिने घेण्यास तयार झाली. यानंतर महिलेला कस्टम क्लिअरन्सची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले अन् या प्रकारात 11.5 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.