सुनिल थिगळे, पुणे | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारात गजबजलेला आहे. दिवाळीत सोने-चांदीची खरेदी करण्याची प्रथा आहे. यामुळे सोने-चांदीचे दुकानदार आपल्या दुकानात पुरेसा साठा ठेवत आहे. सर्व ज्वेलर्स दिवाळीच्या तयारीला लागले असताना पुणे जिल्ह्यात वेगळीच घटना घडली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. सात जणांनी मिळून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. सोने चांदीचे दागिने आपल्या बॅगांमध्ये भरू लागले. परंतु अवघ्या पाच मिनिटांत पोलीस आले.
मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. काही हत्यारांचा वापर करत त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन आल्यानंतर पाच मिनिटात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोने, चांदीचे दागिने बॅगेत भरत असताना पाच जणांना पकडले. यावेळी दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
pune manchar robbery in cctv police arrest five persons pic.twitter.com/HXDrad9mCm
— jitendra (@jitendrazavar) November 8, 2023
robbery
पोलिसांनी घटनास्थळी पाच जणांना अटक केली. त्या दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत चोरट्यांकडून कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेते दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे का? हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या टोळीतील दरोडेखोर अट्टल आहे. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची शक्यता उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केली. आरोपींच्या चौकशीतून आणखी माहिती उघड होणार आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव बाळू रोकडे, गणेश रामचंद्र टोके, अजय सखाराम भिसे, ग्यानसिंग भोला वर्मा, मोहम्मद अरमान दर्जी यांचा समावेश आहे.