पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : पुणे शहरात मागील महिन्यात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनला जून महिन्यात आग लागली होती. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. आता शुक्रवारी सकाळी पुन्हा एका गोडाऊनला आग लागली आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथील गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ११ वाजता कुलिंगच काम पुर्ण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे शहरातील कोंढवा भागात असलेल्या गोडाऊनला आग लागली. हे कापडाचे गोडाऊन आहे. ही आग कशामुळे लागली ते स्पष्ट झाले नाही. परंतु काही कालावधीतच आग्नीने रौद्र रुप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी पाठवली गेली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दूरवर पसरले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू होते. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्यातील वाघोलीत असलेल्या गोडाऊनला मे २०२३ मध्ये भीषण आग लागली. आगीत ४ सिलेंडर फुटले होते. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही मोठी आग लागल्याची घटना घडली होती. जून महिन्यात मार्केट यार्डमध्ये असलेल्या हॉटेलला आग लागली होती. त्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. आता येवलेवाडीत गोडाऊनला आग लागली आहे. ही आग कशामुळे लागली, हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.