Pune News : पुणे दहा लाखांच्या लाच प्रकरणाचा अहवाल आला, डिनसंदर्भात काय म्हटले आहे अहवालात

Pune News : पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याने प्रवेश घेण्यासाठी दहा लाखांची लाच घेतली होती. यासंदर्भात नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने आपला अहवाल दिला आहे. काय आहे समितीने दिलेल्या या अहवालात...

Pune News : पुणे दहा लाखांच्या लाच प्रकरणाचा अहवाल आला, डिनसंदर्भात काय म्हटले आहे अहवालात
Ashish Shrinath BanginwarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 10:17 AM

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता आशिष बनगीनवार याला 10 लाखांची लाच घेताना पकडले गेले होते. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून बनगीनवार याने लाच मागितली होती. MBBS प्रवेशासाठी एकूण 16 लाख रुपयांची मागणी त्याने केली होती. त्यातील 10 लाख घेताना पकडला गेला होता. या प्रकरणी पुणे मनपाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल आला आहे.

काय आहे अहवालात

अधिष्ठाता डॉ. आशिष बनगीनवार याला दहा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे महापालिकेने तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे आणि दक्षता विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांचा समावेश होता.

अहवाल आयुक्तांकडे

या समितीने आपला अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी अधिष्ठाता आशिष बनगीनवार याला दोषी असल्याचे म्हटले आहे. समितीने आपला अहवाल आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिला आहे. अधिष्ठाता दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे असल्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काय होते प्रकरण

वैद्यकीय प्रवेशासाठी १५ जागा व्यवस्थापन कोट्याच्या आहेत. नियमित एमबीबीएससाठी ७ लाख रुपये फी आहे. तर व्यवस्थापन कोट्यासाठी २१ लाख रुपये शुल्क घेतले जाते. तसेच अनिवासी भारतीयांकडून ३५ लाख रुपये घेतले जातात. परंतु मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला एनआरआय कोट्यातून प्रवेश घ्यावा, असे सांगितले जाते. त्यामुळे पाच वर्षांसाठी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जाते. त्यावर तडजोड करून १६ ते २० लाख रुपये मागितले जातात. अधिष्ठाता आशिष बनगीनवार याने असाच प्रकार करत १६ लाखांची लाच मागितली. त्यातील दहा लाख घेताना ८ ऑगस्ट रोजी पकडले गेला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.