Pune Metro : पुणे मेट्रोच्या तिसऱ्या फेजचे काम कधीपर्यंत होणार पूर्ण, पीएमआरडीएकडून महत्वाचे अपडेट

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर आता पुणेकरांना तिसऱ्या प्रकल्पाचे वेध लागले आहे. आता हा मार्ग कधी पूर्ण होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Pune Metro : पुणे मेट्रोच्या तिसऱ्या फेजचे काम कधीपर्यंत होणार पूर्ण, पीएमआरडीएकडून महत्वाचे अपडेट
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 1:21 PM

पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. पुणेकर या मेट्रोला चांगला प्रतिसाद देत आहे. यामुळे फेज ३ च्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, असे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.

किती झाले काम पूर्ण

पुणे मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने आणि मार्गांच्या विस्ताराची मागणी होत आहे. यामुळे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (पीएमआरडीए) माणला जोडणाऱ्या 23.2 किमी लांबीच्या मेट्रो लाईन 3 प्रकल्पाच्या विकास कामाला गती दिली आहे. माण ते हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग 3 चे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेशखिंड रोडवरील डबल डेकर उड्डाणपुलाच्या विकासाचे कामही पीएमआरडीएने मेट्रो लाइन 3 प्रकल्पातून हाती घेतले आहे.

रामवाडी ते स्वारगेट कधी होणार काम

महामेट्रोच्या रामवाडी ते स्वारगेट या मार्गाचे काम यावर्षा अखेरपर्यंत होणार आहे. बंडगार्डन ते रामवाडी या विभागाचे काम ऑक्टोंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. रामवाडी मार्गावर अनेक महत्वाचे स्थानके आहेत. त्यात बंडगार्डन, येरवाडा, कल्याणीनगर, नगर रोड या स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे सिव्हील कोर्ट ते स्वारगेट स्थानक हा संपूर्ण अंडरग्राऊंड आहे. यामध्ये कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट हे महत्वाचे स्थानक आहेत. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग सुरु झाल्यानंतर मेट्रोचा एकूण प्रवास 24km वरुन 33km वर जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुणेकर मेट्रो प्रवासाला चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहेत. शनिवार अन् रविवारी ३० टक्के सवलत मेट्रो प्रवाशांना दिली जाते. यामुळे या दोन दिवस चांगलीच गर्दी होत असते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.