Pune Metro | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत महत्वाचे अपडेट, मार्गावरील ५ हजार सेगमेंट…
pune metro news : पुणे मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत आणखी तब्बल तीन हजार सेगमेंट उभे करण्यात आले. यामुळे येत्या एप्रिल महिन्यात पुणेकरांना मेट्रो तीन मिळणार आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 4 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर मेट्रोचा तिसरा टप्पा कधी सुरु होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागेल आहे. पुणे मेट्रोचा हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबाचा मार्ग आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर २३ स्थानके उभारण्यात येत आहे. या मार्गाचे काम पीपीपी तत्त्वावर पीएमआरडीएकडून वेगाने सुरु आहे. आता या मार्गासंदर्भात महत्वाचे अपडेट मिळाले आहे. पुणे मेट्रोच्या हिंजवडी मार्गातील ५ हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे एकूण १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सेगमेंट बसवून तयार झाला आहे. आता त्यावर रूळ बसवण्यात येणार आहे. हा मार्ग एप्रिल २०२४ मध्ये सुरु होणार आहे.
८० टक्के खांबाची उभारणी पूर्ण
पुणे मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पांच्या कामांना वेग आला आहे. या मार्गावरील कामकाजाची काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली होती. त्यांनी हे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रो मार्गावरील ५ हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण झाली आहे. मेट्रो तीनच्या दोन हजार सेगमेंटची उभारणी २४ एप्रिल २०२३ ला पूर्ण झाली होती. या मार्गावरील ८० टक्के खांबाची उभारणी आता झालेली आहे.
सात महिन्यांत वेगाने काम अन्…
पुणे मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे सात महिन्यांच्या कालावधीत आणखी तब्बल तीन हजार सेगमेंट उभे करण्यात आले. मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून गेल्या १६ महिन्यांत पाच हजार सेगमेंटच्या उभारणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. यामुळे पुणेकरांना एप्रिल २०२४ पासून मेट्रोचा तिसरा टप्पा मिळण्याची आशा निर्माण झाला आहे. त्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवाडी मार्गावर वाहतुकी कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. पुणे मेट्रोसाठी आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली आहे. पुढील ३५ वर्ष मेट्रोची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे.