पुणे मेट्रोने रचला नवा विक्रम, एकाच दिवसात साडेतीन लाख प्रवाशांची मेट्रो सफर

Pune Metro record: पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पुण्यातील सर्वाधिक चर्चेतील शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्धघाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे मेट्रोचा हा मार्ग भुयारी मार्ग आहे. तसेच पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली होती.

पुणे मेट्रोने रचला नवा विक्रम, एकाच दिवसात साडेतीन लाख प्रवाशांची मेट्रो सफर
pune metro
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 1:18 PM

Pune Metro: पुणे शहरात सार्वजनीक वाहतूक व्यवस्था वर्षभरापूर्वी फक्त पीएमपीएमएलवर अवलंबून होती. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील दोन मार्गावर मेट्रो सुरु केली. त्यानंतर सातत्याने वाहतूक कोंडीतून प्रवास करणाऱ्या पुणेकरांना नवीन पर्याय मिळाला. पुण्यात मेट्रो सेवा लोकप्रिय होऊ लागली. पुणेकर आपल्या वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले. मेट्रोने शनिवारी, रविवारी सवलत, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा प्रवास सुरु केला. आता पुणे शहरातील मेट्रोने गणेश विसर्जनाच्या दिवशी नवीन विक्रम रचला आहे. पुणे मेट्रोतून एकाच दिवसात साडेतीन लाख प्रवाशांची प्रवास केला आहे. मेट्रोच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

एकाच दिवसांत पुणे मेट्रोला 54 लाखांचे उत्पन्न

पुणे शहरात अनंत चतुदर्शीला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. त्यावेळी लाखो पुणेकर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. अनेकांनी बसने प्रवास केला. परंतु लाखो लोकांनी मेट्रोने प्रवास केला. यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने नवीन विक्रम रचला. मंगळवारी एकाच दिवसात साडेतीन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. लाखो पुणेकरांनी विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी मेट्रोचा आधार घेतला. एकाच दिवसात तीन लाख 46 हजार 633 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे मेट्रोला 54 लाख 92 हजार 412 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दहा दिवसांत सात लाख प्रवाशांचा प्रवास

पुणे मेट्रोतून गणेश उत्सवातील दहा दिवसांत 6 लाख 93 हजार 580 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे पुणे मेट्रोला 3 कोटी 5 लाख 81 हजार 59 रुपयांचा महसूल मिळाला. 7 ते 17 सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत सेवा दिली होती. तसेच 17 आणि 18 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला 24 तास सेवा दिली होती.

हे सुद्धा वाचा

मोदी यांच्या दौऱ्यात आणखी नवीन मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पुण्यातील सर्वाधिक चर्चेतील शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्धघाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे मेट्रोचा हा मार्ग भुयारी मार्ग आहे. तसेच पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर चाचणीही घेण्यात आली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.