पुणे मेट्रोचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण?

Pune Metro : पुणे मेट्रो आणि चांदणी चौकातील पूल सुरु होण्याची प्रतिक्षा पुणेकर करत होते. परंतु त्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. हे दोन्ही कामे जाहीर केलेल्या वेळेत सुरु होणार नाही. यामुळे पुणेकरांच्या नशिबी सध्यातरी प्रतिक्षा आहे.

पुणे मेट्रोचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण?
File Photo
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 8:00 AM

प्रदीप कापसे, पुणे : पुणे शहरातील नागरिकांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. चांदणी चौकातील पुलाचे उद्घघाटन १ मे रोजी होणार होते. परंतु तो मुहूर्तही हुकणार आहे. तसेच पुण्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय अशी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मात्र गरवारे ते रुबी हॉल या मार्गपर्यंत टेक्निकल ट्रायल पूर्ण झाली आहे. ही मेट्रो १ मे रोजी सुरु होणार होती. परंतु तिचा मुहूर्त हुकणार आहे. मेट्रो प्रकल्पाची कामे अपूर्ण आणि वरिष्ठांना वेळ नसल्यामुळे १ मे रोजी गरवारे ते रुबी हॉल मेट्रो सुरु होऊ शकणार नाही.

काय आहे कारण

वनाज, आनंदनगर, नळस्टॉप, गरवारे कॉलेज या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून काम करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधिशांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती नेमून संपूर्ण मेट्रो मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी जनहित याचिका दाखल होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

असे आहेत विस्तारित मार्ग

  1.  फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे अंतर ८ किलोमीटर आहे. या मार्गावर बोपोडी, दापोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय अशी स्थानके आहे.
  2. गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल रुग्णालय हे अंतर ७ किलोमीटर आहे. या मार्गावर डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका भवन, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन आणि रूबी हॉल रुग्णालय हे स्थानके आहेत.

का लागणार उशीर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महामेट्रोने दोन्ही विस्तारित मार्ग एक मेपर्यंत सुरू होऊ शकतील, असे या पूर्वी म्हटले होते. परंतु, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून पिंपरी-शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाची पाहणी येत्या मंगळवारी (दि २ मे) होणार आहे. त्या पाहणीसाठी ५-६ दिवस लागतील. ही तपासणी झाल्यानंतर गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

दोन्ही मार्गांच्या मेट्रोच्या कामाची पाहणी झाल्यावर ते प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र महामेट्रोला मिळेल. त्याची माहिती महामेट्रोकडून राज्य सरकारला कळविण्यात येईल. त्यांच्याकडून मंजुरी आल्यावर उद्‍घाटनाची तारीख निश्चित होईल. त्यानंतर प्रवासी वाहतुकीला मुहूर्त मिळणार आहे. आता जूनमध्ये याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. वनाज- गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गाचे आणि त्यावरील चार स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सहा मार्च रोजी उद्घाटन झाले होतेय

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.