पुणे | 7 सप्टेंबर 2023 : पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात उद्घाटन केले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग सुरु झाले होते. पुणेकरांनी मेट्रोला चांगलाचा प्रतिसाद दिला आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार केला जात आहे. पुणे मेट्रोचा विस्तार करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरातील मेट्रोच्या विस्तारीत मार्गांना गती मिळणार आहे.
पुणे मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ही प्रक्रिया केला जात आहे. आता या विस्तारीत मार्गासाठी आर्थिक तांत्रिक सल्लागार समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता सल्लागाराकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे मेट्रोच्या विस्तार करण्यासाठी झालेल्या बैठकीत पुलगेट ते हडपसरदरम्यानचा अहवाल स्वतंत्रपणे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलगेट ते हडपसर हा आठ किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गाचा तांत्रिक आणि आर्थिक अहवाल केला जाणार आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या कोणाता प्रकल्प व्यवहार्य आहे. हा निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवाजीनगर ते लोणी काळभोर या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तांत्रिक सल्लागार समिती नेमण्याची सूचना केली आहे. आता यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम सुरु आहे. हाच मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढण्याचा निर्णय होणार आहे. म्हणजेच शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर मेट्रोचा विस्तार करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यानचे काम महामेट्रोकडून केला जात आहे. तसेच खडकवासला ते खराडी हा मार्ग केला जाणार आहे. हा मार्ग २८ किलोमीटरचा आहे. शिवाजीनगर ते लोणी काळभोर मार्ग पीपीपी मॉडल पद्धतीने राबण्यात येणार आहे.