Pune Metro Update | मेट्रोच्या कामामुळे छत्रपती संभाजी महाराज पूल रात्री बंद!

पुण्यात मेट्रोच्या कामाने वेग पकडला आहे. प्राधान्य मार्गावर मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातल्या वाहतूकीत काहीसा बदल करण्यात आला आहे. 24 ऑगस्ट रात्रीपासून ते 12 सप्टेंबरदरम्यान पुण्यातला संभाजी महाराज पूल (लकडी पूल) वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Pune Metro Update | मेट्रोच्या कामामुळे छत्रपती संभाजी महाराज पूल रात्री बंद!
संभाजी महाराज पूल (लकडी पूल)
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:48 AM

पुणे : पुण्यात मेट्रोच्या (Pune Metro) कामाने वेग पकडला आहे. प्राधान्य मार्गावर मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातल्या वाहतूकीत काहीसा बदल करण्यात आला आहे. 24 ऑगस्ट रात्रीपासून ते 12 सप्टेंबरदरम्यान पुण्यातला संभाजी महाराज पूल (लकडी पूल) (Lakdi Bridge) वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकाळात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. (The Sambhaji Maharaj Bridge in Pune has been closed for traffic in night due to Metro work)

पुलावर गर्डर टाकण्याचं काम

वनाज (Vanaj) ते जिल्हा न्यायालयदरम्यान (District Court Metro) मेट्रोच्या कामासाठी संभाजी महाराज पुलादरम्यान गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. या भागात दिवसा वाहतूकीचा ताण पाहाता हे काम रात्री करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाजी पुलावरची वाहतूक रात्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाने केलं आहे.

खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

खंडोजीबाबा चौक, कर्वे रोडने शेलारमामा चौक, यशवंतराव चव्हाण चौक, रसशाळा चौक, एस. एम. जोशी पूल, गांजवे चौक, डावीकडे वळून टिळक चौक किंवा उजवीकडे वळून शास्त्री रोडने दांडेकर पुलमार्गे इच्छित स्थळी जावे.

टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरीवाडा, रमणबाग शाळा चौक, डावीकडे वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंधर्व पुलावरून डावीकडे वळून जंगली महाराज रोडने खंडुजीबाबा चौक तसेत केळकर रोडने नदीपात्रातील रोडने ओंकारेश्वर मंदिरामार्गेही वाहनचालक जाऊ शकतात. यशवंतराव चव्हण पुरावरून फक्त दुचारी वाहने ये-जा करू शकतात.

यावर्षाच्या अखेरपर्यंत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा

पुणे मेट्रोच्या दोन्ही प्राधान्य मार्गांची कामं पूर्ण झाली आहेत. या मार्गांवरच्या स्थानकांची कामंही प्रगतीपथावर आहेत. पुढच्या काही दिवसांत प्रवासी सेवा सुरू करता यावी यासाठी मेट्रोकडून इतर तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. या सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षाच्या अखेरपर्यंत पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

तात्पुरत्या स्वरूपात फुगेवाडीत कंट्रोल सेंटर

महामेट्रोकडून आता पुण्यातल्या मेट्रोसाठीचं ऑपरेशनल कंट्रोल सेंटर कार्यन्वित करण्यात आलं आहे. फुगेवाडी इथं हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. या सेंटरच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या दोन मार्गांवर मेट्रोचं संचलन आणि नियंत्रण केलं जाणार आहे.

इतर बातम्या :

Pune Gold Rate | पुण्यात चांदीच्या दरात 800 रुपयांची उसळी तर सोनंही काहीसं वाढलं, आज काय आहे सोन्या-चांदीचा दर?

Pune Weather | पुण्यात आज हवामान कोरडे, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याच्या शक्यता

वकिलीची प्रॅक्टिस, पहिल्याच फटक्यात नगरसेवकपद ते राज्यसभेच्या हंगामी सभापती, कोण आहेत वंदना चव्हाण?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.