आमदार चेतन तुपे अजित पवार गटात गेल्यास ‘हा’ मोठा नेता येणार शरद पवार गटात

Ajit Pawar and Shard Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु काही आमदार तटस्थ राहिले आहे. त्यामागे स्थनिक पातळवरचे गणित आहे.

आमदार चेतन तुपे अजित पवार गटात गेल्यास 'हा' मोठा नेता येणार शरद पवार गटात
chetan tupe
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 7:16 PM

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या पंधर दिवसांपासून मोठे बदल झाले. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यांच्याबरोबर आलेल्या नऊ जणांना मंत्रिपद मिळाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु त्यातील काही आमदार अजूनही निर्णय घेऊ शकले नाही. त्यांनी तटस्थ राहण्याचा विचार केला आहे. त्यात हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांचाही समावेश आहे.

कशी बदलली तुपे यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार चेतन तुपे शरद पवार गटाच्या बैठकीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. म्हणजेच आमदार चेतन तुपे द्विधा मनस्थित असल्याचे दिसून आले. यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु त्यामागे चेतन तुपे यांचे २०२४ च्या विधानसभेचे गणित आहे. चेतन तुपे अजित पवार यांच्या गटात गेल्यास त्यांच्या मतदार संघातील मोठा नेता शरद पवार यांचा गटात येणार आहे.

आधी पाहूया 2019 मधील गणित

हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे 2019 मध्ये विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार आणि 2014 मध्ये आमदार म्हणून विजयी झालेले योगेश कुंडलिक टिळेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत चेतन तुपे यांना 92 हजार 326 मते मिळाली तर योगेश टिळेकर यांना 89 हजार 506 मते मिळाली होती. त्यामुळे थोड्याच मतांनी चेतन तुपे यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे प्रभावी ठरले होते. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 34 हजार 809 मते मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे यांची अशी आहे खेळी

चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्या गटात उडी घेतल्यास मनसे नेते वसंत मोरे यांची शरद पवार गटात एन्ट्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तशी रणनिती तयार केल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे चेतन तुपे यांना २०२४ ची निवडणूक अवघड जाईल. म्हणून चेतन तुपे सध्यातरी तटस्थ राहण्याच्या भूमिकेत आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.