Rohit Pawar : भाजप आमच्या लोकांचा घात करतंय; रोहित पवार यांचा गंभीर आरोप
MLA Rohit Pawar on BJP : अजितदादांच्या बद्दल बोलणं हे भाजपचं राजकारण, आमच्या लोकांचा घात करतंय; रोहित पवार यांचे गंभीर आरोप. धनगर आरक्षणावरूनही सरकारला सवाल. म्हणाले, तुम्ही तर ट्रीपल इंजिन सरकार ना...
पुणे | 20 सप्टेंबर 2023 : अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. तसंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र डागलंय. भाजप आमच्या लोकांचा घात करत आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलं. यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनगर आरक्षणावरही रोहित पवारांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे सरकारला थेट सवाल केलाय.
स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा जेव्हा त्यांच्या सरकार नव्हतं तिथे जाऊन ते रस्त्यावर झोपले एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन होतं. तेव्हा त्यांनी तिथे जाऊन दुर्दैवाने गरीबाच्या फोटो नाटक केला. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा विषय जेव्हा त्यांचा सरकार नसतं. त्यावेळेस घसा कोरडा पडेपर्यंत ते तिथं आंदोलनामध्ये बोलतात. पण जेव्हा त्यांची सत्ता येते. तेव्हा ते शांत बसतात. मला असं वाटतं की भाजपचे मोठे नेते मुद्दाम या छोट्या नेत्यांना पुढे करतात. परत म्हणतात की, या नेत्यांच्या विरोधात बोल… पवार साहेबांबरोबर बद्दल बोलले. आम्ही समजू शकतो. पण ज्यांना तुम्ही सोबत घेतलं. त्या तुम्ही अजितदादांबद्दल तुम्ही बोलता हे भाजपचं राजकारण आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
गोपीनाथ मुंडेंपासून पंकजाताईंपर्यंत आणि फुंडकरसाहेबांपासून अडवाणीसाहेबांपर्यंत इतर सर्व जे लोकनेते होते. त्यांचं भाजपनं काय केलं? त्यांना संपवलंच ना… अशी परिस्थिती ते लोकनेत्यांची आहे. तर आता इथून तिकडे गेलेल्या नेत्यांचे काय होणार बघा…, असंही रोहित पवार म्हणालेत.
तुम्ही राज्याचे कृषिमंत्री आहात. तुम्ही केवळ एखाद्या जिल्ह्याचे मंत्री नाहीत. बीडमध्ये काही गोष्टी करत असाल तरी अडचण नाही. माञ एखद्या जिल्ह्यात मंजूर झालेला प्रकल्प रद्द करणं योग्य नाही. तुम्ही तिथं उपकेंद्र करा. प्रकल्प पळवू नका, असं म्हणत रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.
भाजप आरक्षणाचं राजकरण करत आहे. हे आरक्षण देखील केंद्रात अडकलं आहे. तुमचं ट्रीपल इंजिन सरकार आहे. मग आरक्षण द्याना. दिल्ली कुणीच आरक्षणाबाबत बोलत नाहीत. भाजपचे लोक राज्यात एक आणि केंद्रात एक बोलतात. कुठलीही भूमिका हे सरकारं घेतं नाही. केंद्रातही तुमचं सरकार आहे. तर EWS चं आरक्षण द्या, असंही रोहित पवार म्हणाले.