VIDEO | पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा नवा कारनामा, दिव्यांगाच्या टेम्पो जॅमरवर हातोडा

अनधिकृत पद्धतीने गाडी लावत व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोटा हाथी टेम्पोला जॅमर बसवले होते (MNS Vasant More Tempo Jammer Hammer)

VIDEO | पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा नवा कारनामा, दिव्यांगाच्या टेम्पो जॅमरवर हातोडा
मनसे नगरसेवक वसंत मोरे
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:02 AM

पुणे : ‘हातोडा पॅटर्न’साठी ओळखले जाणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पुणे अतिक्रमण विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या टेम्पोला लावलेले जॅमर मोरेंनी हातोड्याने तोडले. खुद्द मोरेंनीच या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Pune MNS Corporator Vasant More breaks Tempo Jammer of Rickshaw with Hammer)

नेमकं काय घडलं

संबंधित दिव्यांग व्यक्ती टेम्पोच्या माध्यामातून आंबे आणि कलिंगड विकण्याचा व्यवसाय करत होता. मात्र अनधिकृत पद्धतीने गाडी लावत व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोटा हाथी टेम्पोला जॅमर बसवले. दिव्यांगाकडून याविषयची माहिती पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांना समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोला लावलेल्या जॅमरवर हातोडा मारला.

पाहा व्हिडीओ 

पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला होता. (MNS Vasant More Tempo Jammer Hammer)

वसंत मोरेंची कोरोनाग्रस्तांना मदत

याआधीही वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

Video | “योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

VIDEO | पुण्यात मनसे नगरसेवकाने करुन दाखवलं, हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल

(Pune MNS Corporator Vasant More breaks Tempo Jammer of Rickshaw with Hammer)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.