Pune Vasant More : ‘एकला चलो रे’ असलं तरी पक्षातच, वसंत मोरेंचं स्पष्टीकरण; लाऊडस्पीकरप्रकरणी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट

आजच्या पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठीही वसंत मोरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत नव्हते, त्यावर विचारले असता पार्किंगला जागा मिळाली नाही, अशी सारवासारव मनसे नेते वसंत मोरे यांनी केली.

Pune Vasant More : 'एकला चलो रे' असलं तरी पक्षातच, वसंत मोरेंचं स्पष्टीकरण; लाऊडस्पीकरप्रकरणी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट
मनसे नेते वसंत मोरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 1:25 PM

पुणे : लाऊडस्पीकरच्या प्रश्नावरून पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी (Pune MNS) पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तर राज्यातील सर्व शहरांतील पदाधिकारीही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे तसेच पत्र पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune police commissioner) काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रामध्ये आवाजाची नियमावली दिलेली आहे. अनेक लोक याबाबत फोन करत आहेत. जर पोलिसांनी याबाबत माहिती दिली नाही तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ. पुढील दहा दिवसात पुणे पोलीस आम्हाला याबाबत माहिती देतो, असे म्हणाले आहेत. त्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू, असा इशारा मनसेने दिला आहे. या बैठकीला वसंत मोरे (Vasant More) यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

‘पार्किंगला जागा मिळाली नाही’

अयोध्या विषयावर ज्या लोकांना बोलायला सांगितले आहे, तेच लोक बोलतील. त्यामुळे माझ्या बोलण्याचा प्रश्नच नाही. तसेच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेले पत्र माझ्याबाबतीत नसल्याचे यापूर्वीच वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. तर अनेक आंदोलनात गायब असल्याबाबत विचारले असता, त्यांनी मनसेत कोणतेही मतभेद नसल्याचेते म्हणाले. दरम्यान, आजच्या पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठीही वसंत मोरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत नव्हते, त्यावर विचारले असता पार्किंगला जागा मिळाली नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.

काय म्हणाले वसंत मोरे?

डेसीबलबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. मला निवेदन कसले ते इकडे आल्यावर माहिती प्राप्त झाली. एका जालन्याच्या कार्यकर्त्यांनी फोन रेकॉर्ड केला अन् त्यानेच वायरल केले आहे. अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंनी प्रवक्ते दिलेत तेच बोलतील. एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. माझे उद्दिष्ट पक्ष वाढवणे, काम करणे आणि नगरसेवक वाढवणे हेच असल्याचे वसंत मोरे म्हणाले आहेत. मनसेचे नगरसेवक निवडून आणेन, असे त्यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.