VIDEO | पुण्यात विद्यार्थ्याकडून रस्त्यावरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, पोलिसांचं टेन्शन वाढलं
हाच काळ असतो, जेव्हा खिशात पैसे नसातात, हाच काळ असतो, जेव्हा खूप काही
पुणे : आपल्या भवितव्यासाठी पुणं गाठलं नाही, असं एकही गाव महाराष्ट्रात कदाचित नसेल. हाच काळ असतो, जेव्हा खिशात पैसे नसातात, हाच काळ असतो, जेव्हा खूप काही बाहेरचं खावंस वाटतं, नवीन कपडे घ्यावेसे वाटतात, पण पैसा जातो तो पुण्यात राहण्यात आणि खानवळीचे पैसे भरण्यात. गावी कशाची कमी नसते, पण आईवडिलांना पासून दूर, करिअरसाठी मुलं पुणं गाठतात एक, एक पैसा वाचवतात. कारण घरच्यांसाठी बेरोजगार आता जास्तीचे पैसे मागू शकत नाही. घरची परिस्थिती समजण्या इतकी जाण आलेलं हे वय असतं.
पुण्यात ४ महिन्यानंतर दिवाळी गावी निघालेल्या स्पर्धा परिक्षेच्या मुलासोबत असं काही घडलं की त्याला रस्त्यावर झोपून आंदोलन करुन सांगावं लागलं, माझं दु:ख समजून घ्या.
बाईकवर पुणे रेल्वे स्टेशनकडे निघालेल्या मुलाला पोलिसांनी अडवलं, त्याने विनंती केली माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, मी तुमच्या दंडाचे पैसे ऑनलाईन भरतो. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते.
अखेर यात वेळ गेला आणि या मुलाची गाडी सुटली, अशी माहिती त्या मुलाने दिली आहे. यानंतर मात्र गाडी गेल्यावर काय, त्याने रस्त्यावर झोपूनच अभ्यास सुरु केला. अर्थात हे पोलिसांच्या हेकेखोरीविरोधातलं आंदोलन होतं.
पुणे हे अजूनही विद्यार्थ्यांचं शहर आहे, हे पोलीस अजूनही का समजून घेत नाहीत, महत्वाचं म्हणजे म्हणजे याच शहरातून एमपीएससीचा अभ्यास करुन अनेक जण पीएसआय होतात. ते देखील या परिस्थितीतून गेलेले असतात.
अखेर पोलिसांनी ४५ मिनिटं या मुलांची विनवणी केली, भावा विदर्भाकडे जाणाऱ्या गाडीत बसवून देऊ, तुला तिकीटाचे पैसे किंवा तिकीट काढून देऊ पण हे आंदोलन आता थांबव अशी विनंती करण्याची वेळ या पोलिसांवर आली.