अरे वाह..! पुणे शहरातील मुळा-मुठा नदी स्वच्छ होणार, काय आहे योजना
pune river mula and mutha | पुणे शहरातील मुळा-मुठा नदी ही गंगा नदी पेक्षाही जुनी आहे. या नदीला पुणे शहराची जीवनरेषा म्हणजे लाईफ-लाईन म्हटली जाते. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे या दोन्ही नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने मेगा प्लान तयार केला आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराची लाईफ लाईन म्हणून मुळा-मुठा नदी ओळखली जाते. सर्वात जुनी असलेली ही नदी आपले अस्तित्व गमवून बसली आहे. गंगा नदीपेक्षाही जुनी ही नदी असल्यामुळे तिला ऐतिहासिक महत्व आहे. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर लांब अंतरावर मुठा नदी या दोन नद्यांचा उगम होतो. त्यानंतर पुण्यात दोन्ही नद्यांचा संगमेश्वर मंदिराच्या भागात संगम होते. या महत्वाच्या नदीचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी महत्वाचा प्रकल्प हात घेतला आहे. नदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६ प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे लवकरच पुणे शहरातील या दोन्ही नद्या स्वच्छ दिसणार आहे.
आता प्रदूषित पाणी नदीत येणार नाही
राज्य शासनाने सरळ प्रदूषित पाणी नदीत सोडले जाणार नाही, यासाठी योजना तयार करण्यात आली. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा नदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६ प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे नदीत प्रदूषित पाणी येणार नाही. राज्य सरकारने यासाठी तब्बल ४९७ कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुणे महापालिकेने राज्य शासनाला यासंदर्भात प्रस्ताव दिला होतो. तो मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे.
एसबीआर तंत्रज्ञानचा वापर
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एसबीआर तंत्रज्ञानाचा वापर करुन पुणे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर हे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदी प्रकल्पात कामांची पाहणी केली. त्यावेळी नदीसुधार प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, येथील काम समाधानकारक सुरू असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले होते.
हे ही वाचा
Pune River | पुणे शहरातील ही नदी गंगा नदीपेक्षा जुनी, काय आहे या नदीचे महत्व