pune mumbai expressway | पुणे-मुंबई एक्स्प्रेसने जाण्याआधी ही बातमी वाचा, महामार्ग राहणार बंद
pune mumbai expressway | पुणे-मुंबई महामार्गावर रोज हजारो वाहन धारक प्रवास करतात. परंतु हा महामार्ग काही तासांसाठी बंद असणार आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात या महामार्गावर काही कामांसाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.
पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन रोज साठ हजारांपेक्षा जास्त वाहने जा-ये करतात. हा महामार्ग बांधताना पुढील 25 वर्षांचा विचार करण्यात होता. परंतु आता या महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक या महामार्गावर होत आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार नेहमी घडत असतो. एकीकडे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ पाऊल उचलले आहे. तर दुसरीकडे महामार्गावर कामेही सुरु केली आहे. यामुळे हा महामार्ग काही तासांसाठी बंद असणार आहे.
कुठे असणार महामार्ग बंद
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अमृतांजन पुलाजवळ बंद असणार आहे. हा महामार्ग अमृतांजन पुलापासून खंडाळा बोगद्यापर्यंत 45/000 पासून 45/800 किलोमीटरवर बंद असणार आहे. या ठिकाणी ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्यामुळे मंगळवारी 10th ऑक्टोंबर रोजी दुपारी 12:00 ते 2:00 दरम्यान बंद असणार आहे. यामुळे मुंबईवरुन पुणे शहराकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावरच थांबवण्यात येणार आहे. तसेच यावेळी हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.
या ठिकाणी वाहतूक सुरु असणार
मुंबईवरुन पुणे जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद असणार आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे पुणे शहराकडून मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत असणार आहे. द्रुतगती मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने परिणाम वाहनांवर होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे दुपारनंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी घेतला होता मेगा ब्लॉग
मुंबई-पुणे मार्गावर गेल्या दोन, तीन महिन्यांत अनेक वेळा मेगा ब्लॉक घेण्यात आला. पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे महामार्गावर दोन वेळा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच 31 ऑगस्ट रोजी महामार्गावर विशेष मेगा ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकच्या वेळी दोन तासांचे काम 45 मिनिटांत पूर्ण करण्यात आले होते. महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग आठ पदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.